मुंबई । बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर आज (सोमवार ) प्रचार करत होत्या. प्रचार कार्यक्रमात मातोंडकर यांना भाजप कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला आहे. यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत अश्लील नाच करून दाखवत ‘मोदी मोदी’च्या घोषणा दिल्याचा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे. याप्रकरणी मातोंडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडले
भाजपा समर्थकांनी नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. काही काळ त्याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यात एक महिला जखमी झाली आहे.

पोलीस संरक्षणाचीही मागणी
प्रचारा दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पोलीस संरक्षण मागणी केली आहे.
मी ‘व्यवस्थित परवानगी घेऊन सभा घेत होती. अत्यंत शांत मार्गाने सभा सुरु असताना भाजपाचे गुंड लोक आले होते. त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आमच्या लोकांनी आधी दुर्लक्ष केलं. पण नंतर त्यांनी अश्लील, विभत्स हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यांनी महिलांमध्ये दहशत पसरवण्याचं प्रयत्न करत असल्याचं उर्मिला मातोंडकर यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *