मुंबई । सध्या अ‍ॅप आणखी एका फीचरवर काम करत असून तुम्हाला तुमच्या चॅटचे स्क्रीनशॉट काढता येणार नाहीत. मागील अनेक दिवसांपासून याची चाचणी सुरू होती. लवकरच हे फीचर अ‍ॅपमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय इन्स्टाग्रामसारखे स्टीकर्सदेखील अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहेत.
व्हॉट्स अ‍ॅप अ‍ॅण्ड्राइडवर बीटा व्हर्जन अपडेट करणार आहे. या अपडेटनंतर युजर्सना चॅटचे स्क्रीनशॉट घेता येणार नसल्याचे व WABetaInfo ने म्हटले आहे.

फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन फीचर
व्हॉट्स अ‍ॅप मागील काही दिवसांपासून फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन फीचरवर काम करत आहे. ऑथेंटिकेशनमध्ये एक नवीन फंक्शन आणणार आहेत. त्याच्यामुळे युजर्सला स्क्रीनशॉट घेता येणार नाही. एकदा हे फंक्शन सुरू झाल्यानंतर फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन एनेबल केल्यानंतर युजर्स चॅटचे स्क्रिनशॉट घेऊ शकत नाही. मात्र, ज्या व्हॉट्स अ‍ॅप युजर्सने फिंगरप्रिंट्स एनेबल केले नसेल तर स्क्रिनशॉट काढता येणार आहेत.

व्हॉट्स अ‍ॅपचे २.१९.१०६ बीटा व्हर्जन अपडेट झाल्यानंतर मीडिया फाइल शेअरिंगसाठी वेगळा इंटरफेस मिळणार आहे. त्यामध्ये इमोजी आणि स्टीकर्ससाठी दोन नवीन स्वंतत्र टॅब असतील. त्याशिवाय, इन्स्टाग्रामसारखे वेळ, लोकेशन आणि अन्य स्टिकर्स दिसणार आहेत. डार्क मोड फीचरवरदेखील व्हॉट्स अ‍ॅपची चाचणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *