मुंबई –रिझर्व्ह बँकेनं (RBI) गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा समितीनं आज रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दर ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आले आहेत. त्यामुळं गृह, वाहन अथवा अन्य कर्जे स्वस्त होणार आहेत. तसंच ज्यांनी गृहकर्ज घेतलंय, त्यांच्या ईएमआयमध्ये घट होण्याची शक्यता आहे.,

२०१९-२० या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत समितीनं रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. समितीच्या सहापैकी पाच सदस्यांनी कपातीचं समर्थन केलं. तसंच या वर्षात आर्थिक विकास दर ७ टक्क्यांपर्यंत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *