मित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका. सत्तेला प्रश्न विचारणे हा आपला अधिकार आहे. घाबरू नका, सत्ता त्याच्या सत्तेच्या जोरावर तुम्हांला त्रास देईल, सत्तेच्या गुर्मीत तुम्हांला दाबण्याचा प्रयत्न करेल. तुमच्यावर धर्मांध बिनडोक कुत्री सोडेल, तूमच्याच भाऊ बंधांना देव आणि धर्माच्या नावाने तुमच्या विरोधात उभी करेल. ती वेळ तुम्हाला विचलीत करेल, ती भावंडे राजाचं अपयश लपवून तुम्हाला व्यक्ती केंद्रित आरोपात गुरफटतील. शिक्षण, रोजगार, गरिबी आणि भ्रष्टाचार यातील अपयश झाकोळण्यासाठी तुमच्यासमोर देव, देश आणि धर्माचे मुद्दे आणतील. त्यामुळे निराश होवू नका असे समजू नका कि तुम्ही एकटेच आहात, तेही थोडेकच असतील, हातावर मोजण्याजोगे, तेही पावसाळ्यात उगवलेल्या अळंबी सारखे, अभ्यास आणि इतिहास माहित नसलेले क्षणिक आणि नाशवंत.
तुम्हाला साथ आहे माझ्यासारख्या बांधवांची, विचार करा हजारो वर्षांपासून या विकृत सनातन्यांशी लढताना बुद्ध, शिवराय, संत नामदेवांपासून तुकारामांपर्यंत या क्रांतिकारकांनी हाच विचार केला असता कि मी एकटाच आहे तर क्रांतीचा लढा उभा राहिला असता कां? नसता राहिला. त्यावेळेस देशाच्या कानाकोपर्‍यातून अनेक समविचारी हाथ एकत्र आले आणि तो एकट्याचा लढा क्रांतीच्या लढ्यात बदलून गेला. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देश्याच्या कानाकोपर्‍यातून लोकं इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध एकत्र आले म्हणूनच तो एकट्याचा लढा स्वातंत्र्याच्या लढाईत परिवर्तित झाला होता.
तुम्हीही तसेच पाय घट्ट रोवून उभे राहा, माझ्या तुमच्या सारखे अनेक हाथ सोबत जुळतील. म्हणून मागे हटू नका. विकृत, क्रूर, खुनी, धर्मांध, सनातनी, मनुवाद्यांविरोधात लढाई सुरु ठेवा. लक्षात असुद्या राजा अपयशी आहे हे त्याच्या गुलामांना ही ठाऊक आहे परंतु राजा देव आणि धर्माच्या फायद्यासाठी आहे हे त्यांच्या छोट्या मेंदूवर पेरण्यात आलंय, यामुळे चं ते राजाच्या अपयशावर न बोलता राजाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. आपल्याला व्यक्ती विरोधी ठरवत आहेत. ज्याप्रमाणे आपण आपल्या कर्तव्याला जागत या अगोदरच्या राजाच्या काळातील चोरी, भ्रष्टाचार आणि त्याच्या असफल योजनांवर बोलत होतो. अगोदरच्या राजाला जसा धीराने विरोध करून खाली खेचलेत तशीच लढाई सुरु ठेवा. ही जाणीव आम्हालाही आहे कि, ही लढाई कठीण आहे आपलेच बांधव या राजाची कुत्री म्हणून आपल्याच अंगावर येतं आहेत. लक्षात असुद्या इतिहासात अत्याचारी सनातन्यांना आणि इंग्रजांना सहकार्य करणारे आपलेच बांधव होते.
तसें म्हटलं तर हा गुलाम गण हा बेअक्कल असतो ही बाब काही देशासाठी आणि आपल्यासाठी नविन नाहीय, शेवटी गुलामच ते, दगड धोंड्याला कौल लावणारे असो किंवा
बलात्कारी बुवा बापूवरील बलात्काराच्या गुन्ह्यांवर त्याला कृष्णा चा अवतार बोलून त्याचे काळे कृत्य धर्माच्या नावाखाली चालवून घेणारे असो किंवा कोण्या भोंदूंच्या सांगण्यावरून पैश्याच्यापावसा साठी बळी देणारे असो किंवा राजाच्या विकासाच्या गाजरा साठी त्याचे सर्वच काळे कृत्य आणि भ्रष्टाचार पाठीशी घालणारे असो.
या सर्वांत काहीही फरक नाहीय.
ज्या प्रमाणे दगड धोंड्या ला बळी देऊन कौल लावणार्‍याला काही म्हणायचे म्हटले कि यांच्या भावना दुखावतात तश्याच काही भावना या गुलामांच्या आहेत.
आज ना उद्या त्यांनाही यात उतारावेच लागेल, अशा वेळेस लोकशाहीर संभाजी भगत यांच्या गाण्याच्या काही ओळी आठवतात.
सुपातलं जात्यात जाणार हाय रं,
हा इतिहास खोटं कधी बोलणार नाय रं,
तोड मर्दा तोड हि चाकोरी, मुक्तीचे गीत म्हण रात हाय अंधारी ॥
जेंव्हा ह्या आजच्या गुलामांच्या ज्यांना आपल्याच दवंडी खोराद्वारे निर्माण केलेली खोट्या उदो उदो ची झापडं उठतील आणि आपणही भाजले जातोय याचे चटके बसतील तेंव्हा त्यांनाही या लढ्यात आपसूक यावेच लागेल. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाद्वारे पुन्हा जिवंत केलेला बुद्धांचा लढा लक्षात असुद्या, त्यावेळेस संत नामदेवांना इथल्याच लोकांनी विरोध केला, त्यांना प्राण घेणे हल्ले सहन करावे लागले, महाराष्ट्र सोडून पंजाब मध्ये जावे लागले, त्यांनंतर च्या काळात जेंव्हा असेंच गुलाम स्वतः भरडू लागले तेंव्हा देशभर अनेक संत निर्माण झाले. यातूनच संत तुकारामांच्या वाणीतून आणि प्रेरणेतून शिवरायांसोबत हजारो मावळ्यांचे स्वराज्य उभे राहिले.
त्यामुळेस म्हणतो कि मित्रानो निराश किंवा नकारात्मक होवू नका. संत तुकाराम म्हणत,
बुडती हे जन, न देखवे या डोळा
म्हणुनी कळवळा, येत असे ॥
असा संत तुकारामासारखा विचार करून कार्यरत राहा.
– प्रमोद शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *