मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत ’पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका सुरू असल्याने या निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनास तुर्तास स्थगिती देण्यात यावी, असं याचिकेत म्हटलंय. आरपीआय (आय) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्यावर मुख्य न्यायामूर्ती नरेश पाटील आणि न्यायामूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग, सीबीएफसी आणि चित्रपटाच्या निर्मात्याला उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच या प्रकरणावर सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार असल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे.

५ एप्रिलला प्रदर्शित होणार
आमचा चित्रपटाला विरोध नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे हा चित्रपट निवडणुका सुरू असताना प्रदर्शित न होता, त्यानंतर प्रदर्शित करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. संदीप सिंग या चिव्पटाचे निर्माते असून या चिव्पटात विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय या चिव्पटात मनोज जोशी, बोमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आदी दिसणार आहेत. येत्या ५ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत
बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला असून अभिनेता विवेक ओबेरॉयने पडद्यावरील मोदींची भूमिका साकारली आहे. मात्र, हा चित्रपट आता अडचणीत “सापडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *