हैदराबाद | निवडणूक प्रचारात विरोधकांसाठी सर्रासपणे वापरण्यात येणाऱ्या ‘वेडा’, ‘पागल’, ‘मेंटल’ या शब्दांवर मनोचिकित्सक सोसायटीने (आयपीएस) आक्षेप घेतला आहे. हे शब्द मनोरुग्णांचे अवमान करणारे असून अमानवीय आहेत. त्यामुळे राजकारण्यांना निवडणूक प्रचारात या शब्दांचा वापर करण्यापासून रोखावे, अशी मागणी आयपीएसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राजकीय नेते निवडणूक प्रचारात, भाषणात विरोधकांसाठी सर्रास मेटल, वेडा या शब्दांचा वापर करतात. हा शब्द अवमान करणारा आहे. या शब्दातून मनोरुग्णांबाबतचा भेदभाव दिसून येतो. त्यामुळे निवडणूक प्रचारात वेडा, मॅटल, यांना रुग्णालयात दाखल करा, अशा आदी अवमान करणार्‍या शब्दांचा प्रयोग करणे चुकीचे आहे. या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

राजकीय नेते जे बोलतात, जसे वागतात त्याचे ऊुकरण केले जाते. त्यांचं प्रत्येक वक्तव्य, भाषण मोठया प्रमाणात वृत्तवाहिन्या, सोशल मिडियाद्वारे प्रसारित होत. त्यामुळे राजकीय नेत्यांनी जबाबदारीने वागले आणि बोलले पाहिजे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने काही निर्देश जारी करायला हवेत, असंही या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *