मुंबई : बर्‍याच वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने सर्वसामान्य व्यक्तींना करोडपती होण्याची संधी दिली. आतापर्यंत या शोचे १० पर्व झाले असून लवकरच ११ वा पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या नव्या पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली असून महानायक अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ट्विटरकरुन ही माहिती दिली आहे. दरवेळी प्रमाणे या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अमिताभ बच्चन यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे केबीसीच्या मंचावर पुन्हा एकदा त्यांचा भारदस्त आवाज ऐकायला मिळणार आहे. यामध्ये तारखेचा उल्लेख नसल्याने प्रेक्षकांची उल्सूकता आता शिगेला पोहचली आहे.

आदर आदाब अभिनंदन आभार! मैं अमिताभ बच्चन प्रस्तुत करने जा रहा हूँ , इस वर्ष २०१९ का नया अभियान कौन बनेगा करोड़पती KBC !! बहुत जल्द आपके घरों में !! असं कॅप्शन देत काही फोटो अमिताभ यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *