नवी मुंबई बातमीदार : नवी मुंबई परिवहन सेवेची सीबीडीवरून खारकोपर येथे जात असलेल्या परिवाहनच्या बसची मागची काच निखळून पडल्याची घटना दि.२८मार्च रोजी घडली. यात कोणीही जखमी झालेले नाही.
महिन्यातील ही तिसरी घटना असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबई परिवहन सेवेची एमएच ४३ एच ५०९९ क्रमांकाची बस सीबीडी येथून खारकोपर स्थानकात जात होती. मात्र आधीच तडे गेलेल्या बसच्या मागील बाजूची काच निखळून फुटली. सुदैवाने बसच्या मागे कोणतेही वाहन नसल्याने सुदैवाने कोणासही दुखापत झाली नाही.मात्र यानिमित्ताने प्रवाशांना सेवे देणाऱ्या बसेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अनेकदा परिवहनचे चालक किंवा वाहक हे अनेकदा थांबलेल्या बसच्या समोर उभे असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे नागरिकांसोबत वाहक व चालकांचा जीव देखील यानिमित्ताने धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यातील बसेसच्या काचा कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे परिवहन सेवेतील मार्गांवर धावणारी वाहने कितपत दुरुस्त आहेत असा प्रश्न उभा ठाकला आहे.आधीच परिवहनचे चालक हे कसेही व कितीही वेगात वाहन हाकण्यात प्रसिद्ध आहेत. त्यात अनेक वाहने खड्ड्यांतून चालवण्यात येत असल्याने अनेक बसेसच्या काचा खिळखिळ्या झाल्या आहेत.मोठ्या काचा असलेल्या बसेस असल्याने खड्यांमध्ये आदळून अनेक काचांना तडे गेलेले पाहायला मिळतात.नियमानुसार डेपोच्या बाहेर वाहन जाताना त्याची संपूर्ण तपासणी होऊनच ते बाहेर पाठवले जाते.मात्र चालत्या वाहनांच्या काचा कोसळण्याच्या घटना घडूनही परिवहन विभाग शहाणा न झाल्याचे या पुन्हा घडलेल्या घटनेतून दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *