गेल्या ३ महिन्यापासून भूकंपाच्या हादर्‍याने पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील लोक भयभीत झाले आहेत. कधीही जमिनीला हादरे बसतात आणि घराच्या खिडक्या धडाधड हलू लागतात. घराचं छत आपण घराबाहेर पाडण्याअगोदरच कोसळून पडेल अनं जीवाला मुकावं लागेल कि काय? अशी भीतीच्या छायेत लोक आहेत. नवीन अनं तरुण जिल्हा म्हणून ओळख असलेला पालघर आता प्रचंड मोठ्या बॉम्बवर उभा आहे. जीव मुठीत घेवून जगणार्‍यांचा विभाग म्हणून तो ओळखला जाऊ लागला आहे, एकीकडे दुष्काळ आणि कुपोषणाचे चटके खात असतानाचं आता निसर्गाचे धक्के सहन करावे लागत आहेत. काय आहे डहाणू, तलासरीची स्थिती?

डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भूकंपाचा धक्का आणि लोक हादरले. त्यानंतर असे अधूनमधून भूकंपाचे हादरे तलासरी आणि डहाणू भागात अनुभवास आले आहेत. आता पर्यंतचा सर्वात जास्त तीव्र हादरा १ फेब्रुवारीला ४.१ रिश्टर स्केल इतका नोंदविला गेला आहे. नजीकच असलेल्या गुजरात मध्ये २००१ साली झालेल्या भूकंपाची नोंद ७.७ रिश्टर स्केल इतकी तीव्र होती. म्हणजेच आपल्या अगदी शेजारीचं असलेल्या अनं देशातील आतापर्यंतच्या चौथ्या क्रमांकाच्या भूकंपाच्या तुलनेत १ फेब्रुवारीचा धक्का हा काही अंकाच्या फरकाइतकच आहे. मात्र यात एका मुलीचा बळी गेलाय…
गेल्यावर्षीचा जव्हार तालुक्यात वाळवंडा गावात झालेल्या भूकंपाच्या हादर्‍याव्यतिरिक्त जिल्ह्यात इतक्या तीव्रतेचे सातत्याने बसणारे झटके अनुभवास आलेले नाहीयेत. मुळात हे धक्के कोणत्या कारणांमुळे बसताहेत हे जरी ऊाकलनीय असलं तरी या भूकंपांना निसर्गाचा कोप म्हणावा कि मनुष्यानं आपल्या स्वतःच्या विकासासाठी केलेल्या निसर्गाच्या र्‍हासाचा विपरीत परिणाम? होय, असं म्हणायला जागा उरते. नव निर्मित या जिल्ह्यात निसर्गाला ओरबडणार्‍या माफियांची संख्याही तितक्याच तीव्रतेने वाढली आहे, मुळात ही टोळी अस्तित्वात होतीच पण अलीकडेच त्यांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे चित्र पालघर मध्ये आहे. बंद झालेली रेती उपसा, अनं रेतीचा म्हणून वापरण्यात येणारा दगडाचा भुगा आणि या दगडांसाठी सुरुंग लावून फोडण्यात येणारे, पोखरून काढण्यात येणारे डोंगरच्या डोगरं! पालघर मध्ये हे असे प्रकार सर्रासपणे चालू आहेत. डोंगर उध्वस्त करण्यात येत असल्याने भौगोलिक संरचनाच बदलत आहे. शासन यावर काय करतेय? मुळात शासनाचे हस्तक्षेप शून्य आहे. त्यामुळे निसर्गच आता भूकंपाच्या माध्यमातून इशारा देवू पहातोय आणि पुढे हे सगळे इुल्या सर्वसामान्यांच्या जीवावर येणार आहे.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे इुल्या लोकांना दहशतीत जक्षाावं लागतंय. ओजच जनजीवनच दडपणाखाली आलंय. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा उंबरठ्यावर येऊन ठेपलेली असताना शाळा,कॉलेजच्या मुलांचं प्रचंड नुकसान होईल की काय, अशी भीती व्यक्त होतेय. एका लहान मुलीचा या भूकंपात बळी गेल्याने ही दहशत जीवघेणी आली आहे. वैभवी भूयाल या दोन वर्षाच्या मुलीला भूकंपाच्या धक्क्यात आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र अद्याप कोणताही सरकारी अधिकारी किंवा जनप्रतिनिधी तिच्या घरी भेट देण्याची किमान तसदी घेऊ शकला नाहीय.
भूकंप हा एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्यासाठी विशेष आपत्ती व्यवस्थापन (डिझास्टर मॅनॅजमेन्ट) अत्यंत आवश्यक असतं. एवढे धक्के बसत असताना सरकार मात्र याबाबत ढीम्म हलत नाहीय. के काम शासनाने ताकदीने करणं अपेक्षित असतात. पालघर मधील भूकंप प्रवण क्षेत्रात शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांवरच आज प्रश्नचिन्ह आणि संताप निर्माण होत आहेत. छऊठऋ ने मागे पाहणीनुसार काही टेंट उभारले आहेत. मुळात एका पाड्यावर एक टेंट अशी उभारणी करून त्यात ७०-८० माणसं राहतील असे दावे शासन जरी करत असला तरी त्यात प्रॅक्टिकली १० ते फारफार २० माणसं या तंबूत राहू शकतात. मिटिगेशन स्ट्रॅटेजी (भूकंप होण्याअगोदर घेण्यात येणार्‍या उपाययोजना) म्हणून अनेक प्रकारच्या बाबी होणे अपेक्षित असते जसे आपत्तीत आरोग्य सेवेची उभारणी, भूकंप प्रवण क्षेत्रात माणसांना विशेष प्रशिक्षण देणे, विशेष मॉबलायजेशन सेंटर (जिथं लोकं एकत्र येऊ शकतील) असे आरोग्यसंपन्न केंद्रांची उभारणी करणं गरजेचं आहे, पण यासर्व बाबतीत अमलबजावणी सोडाच, केवळ ढोबळ कारभार पाहावयास मिळतो आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरच्या दौर्‍यावर होते. जवळपास संपूर्ण जिल्हा भूकंपाच्या दहशतीत असताना मुख्यमंत्री एकाही भूकंपप्रवण क्षेत्राच्या भागातील लोकांना भेटले नाहीत. भूकंपामुळे प्राण गमावलेल्या वैभवीच्या घरच्यांच्या भेटीला सुद्धा गेले नाहीत. लोकांचा याबाबत राग आहे. गेल्या मे महिन्यात झालेल्या पोट निवडणुकीत भाजपाला फक्त १ जागा काढता आली, ती पालघर मधलीच! आशा पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या दहशतीत राहणार्‍या आणि नुकसानीला सामोरं जावं लागलेल्या लोकांना भेट देण्याची गरज मुख्यमंत्र्यांना वाटली नाही. वाडा येथे माजी पंतप्रधान अटलजींच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुतळे उभारण्याच्या नादात माणसं मुळासगत खचली जातायेत त्याचं काय? मुख्यमंत्रांनी उपाय योजनांसाठी जलद कार्यवाहीचे निर्देश अधिकार्‍यांना देणं अपेक्षित होते. ३ महिन्यापासून होत असलेल्या भूकंपाची कारणं कोणती? हा प्रश्न सर्वांच्या मनात अजूनही आहे. सरकार आणि त्यांची यर्ंत्रीा लोकांना काही दिलासा देईल का? की मोठ्या आपत्तीची सरकार वाट पहात आहे?

-स्वप्नील तरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *