आपल्या आवडत्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन त्यातच करिअर करून यशस्वी व्हायचं असं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं, पण अनेकदा आर्थिक अडचणींमुळे तसंच योग्य माहितीअभावी विद्यार्थ्यांना आपलं स्वप्न पूर्ण करणं शक्य नसतं. अशा गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी सरकारी आणि सामाजिक संस्थांच्या अनेक शिष्यवृत्ती योजना उपलब्ध असतात. अशा विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती खास विद्यार्थ्यांसाठी… 

 

 

 

किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (के.व्ही.पी.वाय.)

ही योजना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे राबवली जाते. १० वी, १२ वी, बी.एस, बी.स्टॅट, बी.मॅथ्स, संबंधित एम.एससी, एम.एस. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष याकरता महिन्याला ५००० रुपये आणि वर्षाला २०,००० रुपये अधिछावृत्ती देण्यात येते. तसंच एम.एससी चतुर्थ आणि पाचव्या वर्षाकरता ७००० रुपये महिना आणि २८,००० रुपये वर्षाला देण्यात येतात. कर्तृत्ववान आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना विज्ञान आणि संशोधन याकडे आकर्षित करण्याकरताही शिष्यवृत्ती देण्यात येते. अधिक माहितीकरता ९१७५५१८०७४ या  हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा आपलं नाव, पत्ता या संबंधीचा एसएमएस पाठवल्यास अर्ज अॅकॅडमीतर्फे आपल्या पत्त्यावर पाठवण्यात येते.

नेशनवाइड एज्युकेशन स्कॉलरशिप टेस्ट

ही शिष्यवृत्ती नेस्ट-१ आणि नेस्ट-२ या दोन भागांत विभागली असून इंजिनिअरिंग, एम.बी.बी.एस., बी.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.डी.एस., १२ वी सायन्स, बी.सी.ए. अॅन्ड बी.एससी., डिप्लोमा इंजिनिअरिंग पहिल्या आणि दुसर्या वर्षाला प्रवेशित विद्यार्थी अर्ज करू शकतात. तसंच तृतीय आणि चतुर्थ वर्षातील विद्यार्थी नेस्ट-२मध्ये अर्ज करू शकतात. २५ जानेवारी २०१५ला नागपूर, मुंबई, पुणे या ठिकाणी परीक्षा घेण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १० विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये देण्यात येतात, त्यापैकी एका विद्यार्थ्याला ७५ हजार रुपये देण्यात येतात. तृतीय आणि चतुर्थ वर्षांतील १० विद्यार्थ्यांना ३५ हजार रुपये आणि एका विद्यार्थ्याला १ लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती मार्गदर्शनाकरता ९१७५२७६०१९ या हेल्पलाइनवर  संपर्क साधावा.

इंडियन स्कॉलर स्कॉलरशिप योजना

या योजनेकरता १० वी, १२ वी, इंजिनिअरिंग, एम.बी.बी.एस., बी.एच.एम.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.डी.एस., १२ वी सायन्स, बी.सी.ए. अॅन्ड बी.एसस्सी, डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. अर्ज भरल्यानंतर महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर इत्यादी ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्रावर २१ फेब्रुवारी २०१५ ला होणार आहे आणि परीक्षेमध्ये गुणवत्तेनुसार प्रत्येकी २० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अर्ज ३० डिसेंबर २०१४ पर्यंत भरावेत. या योजनेकरता अर्ज www.manavsevaindia.com या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे. शिष्यवृत्तीच्या माहिती अभावी विद्यार्थी या लाभापासून वंचित आहेत, म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरता ९२७३६६३०३२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

ओ.एन.जी.सी. ऑफिसर स्कॉलरशिप योजना

या योजनेंतर्गत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना चार वर्षांकरता ४ हजार रुपये महिना देण्यात येतात. एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांना चार वर्षांकरता ४ हजार रुपये महिना देण्यात येतात. एम.बी.ए.च्या दोन वर्षांकरता ४ हजार रुपये महिना देण्यात येतात. तसंच मास्टर डिग्रीकरता दोन वर्षांकरता प्रत्येकी ४ हजार रुपये महिना देण्यात येतात. यामध्ये ५० टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहे. प्रत्येक वर्षाला ४८ हजार रुपये मिळणार्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. उच्च शिक्षण मिळाल्यास उच्च प्रतिची नोकरी मिळते. एक विद्यार्थी एकापेक्षा जास्त स्कॉलरशिप्ससाठी अर्ज करू शकतो. हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. माहितीअभावी विद्यार्थी या योजनांपासून वंचित आहेत. अधिक माहितीकरता विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका, फोटो आणि बायोडेटा पाटील करिअर अॅकॅडमी, इंडियन स्कॉलर इंग्लिश स्कूल, न्यायालयाची जुनी इमारत, कॉटन मार्केटसमोर, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येथे पाठवावेत. या अॅकॅडमीतर्फे मोफत स्कॉलरशिप सेमिनारही घेण्यात येतात. १००पेक्षा जास्त स्कॉलरशिप्सचं मोफत मार्गदर्शन केलं जातं. तसंच स्कॉलरशिप इन्फॉर्मेशन सेंटर (एस.ई.सी.) द्वारे राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संपूर्ण शिष्यवृत्ती योजनांची माहिती, या योजनांची पुस्तिका (प्रॉस्पेक्टस्) विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करण्यात येते. तसंच जगभरातील शासकीय/निमशासकीय नोकरीचे अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण आणि युवकांच्या, तरुण मुला-मुलींच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात सेंटर सुरू करण्याची अॅकॅडमीची इच्छा आहे. याकरता इच्छुक व्यक्तिंनी आपली संपूर्ण माहिती कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावी किंवा ९१७५५१८०७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 डॉ. नंदकिशोर पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *