आज देशभरात धर्माच्या नावावर प्रचंड गोंधळ माजवला जातोय. प्रत्येकजण आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा अटोकाट प्रयत्न करतोय. यातच आता धर्मांतराचा एक मुद्दा पुढे करून ‘घर वापसी’ असं या मुद्याला म्हटलं जातंय. हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मातील लोकांना हिंदू धर्मात आणण्याचा जाहीर कार्यक्रमच देशभर राबवला जातोय. या कार्यक्रमाला विरोधी पक्षापासून सर्वच स्तरातून विरोध होत आहे. तसंच आता हा प्रश्न संसदेतही विरोधकांकडून उपस्थित केला गेलाय. यामुळेच धर्मांतराचा कायदा आणावा की नाही याबाबत आता चर्चा सुरू झालीय…

 

 

 

 

 

 

ritu धर्म ही वैयक्तिक बाब

धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असावी, असं मला वाटतं. यामुळेच धर्मांतरविरोधी कायदा आणण्यापेक्षा धर्माच्या  नावावर होणारं विकृतीकरण कसं थांबेल यावर शासनाने अधिक गंभीरपणे विचारविनिमय करावा, जेणेकरून असे प्रकार  घडणार असं मला वाटतं.

 – रितू पोळ, विद्यार्थिनी

 

 

swapnilआवडीचा धर्म निवडण्याची मुभा असावी

सध्या या कायद्याची गरज आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात बाटवलेल्या हिंदुंसाठी जो घर वापसीचा कार्यक्रम राबवला जात आहे याचं समर्थन करणं योग्य नसलं तरी प्रत्येकाला आपल्या आवडीचा धर्म निवडण्याची मुभा असावी.

– स्वप्निल घाडीगावकर, विद्यार्थी

 

 

arti मानवी हक्कांवर गदा आणणारा कायदा

धर्मांतरविरोधी कायदा अंमलात आणणं म्हणजे मानवी हक्कांवर गदा आणण्यासारखंच आहे. केंद्र सरकारने विकासाच्या  नावाखाली हा कारभार चालवालाय, असं मला वाटतं. सरकारचा हा कारभार अत्यंत निंदनीय आहे.

 – आरती भगत, विद्यार्थिनी

 

 

 

saurabhसरकारने विकासाकडे लक्ष द्यावं

धर्मांतरविरोधी कायदा? हेच मुळात हास्यास्पद आहे. इतके महत्त्वाचे कायदे आणि निर्णय प्रलंबित ठेवून केंद्र सरकारने अशा गोष्टीवर लक्ष देणं म्हणजे विकासाला आळा घालण्यासारखंच आहे, असं माझं ठाम मत आहे.

– सौरभ तावडे, विद्यार्थी

 

 

akshay असे वाद निर्माणच होऊ नयेत

विज्ञानयुगात जगताना धर्मासारख्या खाजगी गोष्टीवर वाद निर्माण होणं हेच मुळात देशाला पुन्हा पारतंत्र्याच्या  विळख्यात अडकवणारं आहे. सरकार जरी हिंदुत्ववादी असलं तरी त्यांनी देशाच्या विकासाला आणि प्रगतीला प्राधान्य  द्यावं.

 – अक्षय यादव, विद्यार्थी

 

 

saritaअशा कायद्यामुळे धाक बसेल!

समाजात प्रत्येकालाच आपला धर्म प्रिय असतो. पण धर्मावरून समाजात जी काही कृत्यं होत आहेत त्याला तरी कायद्याने धाक बसेल. त्यामुळे असा कायदा आणावा का यापेक्षा तो असलेला बरा… कारण समाजात नेहमीच दोन वर्ग असतात, हो किंवा नाही म्हणणारे. मी निधर्मी आहे. काही लोक सर्वधर्म समभाव पाळणारे असतात. काही धर्मांतराच्या विरोधात. स्वतःच्या धर्मापेक्षा इतरांच्या धर्मावर आक्षेप घेणारेही असतात.

– सरिता लोकरे, विद्यार्थिनी

 

संकलन – समर देवकते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *