भावनेचा सोयीचा खेळ

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा तिथी आणि तारखेचा घोळ घालून निर्लज्जपणे सरकारी जयंती असं दिनदर्शिकेत साळगावकर लिहितात त्यावेळी कुणाच्या भावना दुखावत नाहीत?

ज्याच्यावर श्रद्धा ठेवली तोच बाबा भक्तांच्या लहान कोवळ्या मुलांचा खून करून प्रेत गटारात टाकून देतो तेव्हा भावना दुखावत नाहीत?

देव म्हणून समोर नतमस्तक होणार्या मुलींना आणि स्त्रियांना बळजबरीने वासनेचं शिकार करून त्यांच्या अब्रूचे धिंडवडे उडवले जातात तेव्हा भावना दुखावत नाहीत?

तथाकथित आश्रमात जो बाबा खाजगी सुरक्षा रक्षक ठेऊन बेकायदेशीर बंदुका बाळगून थेट देशाविरुद्ध युद्ध पुकारतो आणि त्यात सामान्य माणसांचे बळी जातात तेव्हा भावना दुखावत नाहीत?

सिनेमातल्या अभिनेत्री सोबत अश्लील चाळे करणारा भगव्या कपड्यातला हरामखोर थेट व्हिडीओमध्ये पकडला जातो तेव्हा कुणाच्या भावना दुखावत नाहीत?

भगवे कपडे घातलेला दिल्लीतला भामटा जेव्हा वेश्याव्यवसाय करणारा भडवा आणि दलाल आहे हे समोर येतं तेव्हा भावना दुखावत नाहीत?

गांजेकस, नंगे फुंगे, नशेडी देवा धर्माच्या नावाखाली सरकारी पैशाने सगळ्या नद्यांमध्ये गु घाण करून पाणी अशुद्ध करतात तेव्हा भावना दुखावत नाहीत?

आपलं न ऐकणारा आपल्याच भक्ताचा कट करून खून करणारा सर्वोच्च धर्मगुरू म्हणून तोंड वर करून पुन्हा समोर येतो तेव्हा कुणाच्या भावना दुखावत नाहीत?

मठ, आश्रम आणि संस्थान यांच्या नावाखाली भगवे कपडे घातलेले लैंगिक शोषण, अमली पदार्थांचा व्यापार आणि सगळे गुन्हेगारी कृत्य करणारे भामटे गणंग रोज सापडतात तेव्हा कुणाच्या भावना दुखावत नाहीत?

सरकारी नोकरीत असताना लाच खाल्ली आणि पैशांचा अपहार केला म्हणून लाथा मारून कामावरून काढून टाकलेला भामटा साधू बनून मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला निर्लज्जपणे मांडवात बसतो तेव्हा भावना दुखावत नाहीत?

कालचा तोंडाला रंग फासून काम करणारा नट, तुमच्याच देवाला थेट कोर्टात खटल्यात ओढतो आणि देवाच्या दुकानदारांची टिंगलटवाळी करतो आणि वर धर्माच्या ठेकेदारांच्या पक्षाकडून खासदार होतो तेव्हा भावना दुखावत नाहीत?

आणि या सगळ्या बाबा, बुवा, महाराज यांच्या विषयी बोलायला लागलं तर हरामखोर उत्तर देतात हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य होणार नाही…

तुमच्या भावना म्हणजे नक्की काय ढोंग धत्तुरा आहे ते आम्हाला तरी कळू द्या.

निर्लज्जपणाचा कळस दुसरं काय असू शकतो?

तुम्ही खाता ती श्रावणी आणि दुसर्याचं ते शेण?

 

– आनंद शितोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *