नुकतीच भगवद्गीतेला ५१५१ वर्षं पूर्ण झाली. याचंच निमित्त म्हणून गीता वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तोही दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यासमोर… याच कार्यक्रमात केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी देशाचा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून भगवद्गीता घोषित करावा, अशी जाहीर मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. पण सुषमा स्वराज यांच्या या मागणीमुळे देशभर एकच गहजब माजला. कुठल्याही एकाच धर्माचा धर्मग्रंथ संपूर्ण राष्ट्राचा ग्रंथ कसा काय होऊ शकतो इथपासून राज्यघटनाच राष्ट्रीय ग्रंथ आहे इथपर्यंतच्या प्रतिक्रिया उमटल्या. कट्ट्यावर देखील यावर प्रतिक्रिया देण्यात आल्या…

 

 

 

 

 

 

 

 

vaishnavi भगवद्गीता राष्ट्रीय ग्रंथ नको

देशाचा राज्यकारभार आपल्या राज्यघटनेनुसार चालतो. जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना म्हणून आपल्या राज्यघटनेचा  सन्मान झाला आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांवर आधारित आपली राज्यघटना जगासाठी प्रेरणा आहे.  त्यामुळे राष्ट्रीय ग्रंथ म्हणून गीतेपेक्षा राज्यघटनाच केव्हाही समर्पक आहे.

 – वैष्णवी शिवणेकर, विद्यार्थिनी

 

 

nitishदोन्ही गं्रथांचा मान राखावा!

माझ्यामते, भगवद्गीतेला सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे. मात्र भगवद्गीतेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व राज्यघटनेलाही आहे. देशाच्या राज्यघटनेला कमी लेखू नये. हे दोन्ही गं्रथ समसमान नसले तरीही दोन्ही ग्रंथांना तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे, असं मला वाटतं.

– नितेश ईगवे, विद्यार्थी

 

 

prajkta राज्यघटनाच राष्ट्रीय गं्रथ

राज्यघटना हा राष्ट्रीय ग्रंथ असावा. कारण राज्यघटनेमुळेच आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे सुरू आहे. आणि  राज्यघटनेनेच आपल्याला मूलभूत हक्क प्रदान केले आहेत. त्यामुळेच मानव आपला विकास साधू शकतो.

 – प्राजक्ता पाटील, विद्यार्थिनी

 

 

 

prashantसंविधान भारतीयांचा धर्म ग्रंथ

संविधान आणि भगवद्गीता हे आपापल्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. हिंदू धर्मासाठी भगवद्गीता महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. मात्र संविधान हे संपूर्ण भारताचं आहे आणि अशी तुलना करणं योग्य नाही. राज्यघटना ही सर्व धर्मांना लागू होते. आपल्या देशात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात त्यामुळे तोच सर्व भारतीयांचा ग्रंथ आहे.

– प्रशांत दिवेकर, विद्यार्थी

 

 

kalpita दोन्ही ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ नाहीत

संविधान आणि भगवद्गीता हे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. संविधान हे केवळ राज्याची घटना आणि  राजकारण यासाठी महत्त्वाचं आहे आणि भगवद्गीता हा हिंदुंचा एक ग्रंथ आहे त्यामुळे तो सगळ्यांवर लादणं चुकीचं आहे.  कारण आपल्या देशात अनेक धर्म आहेत. त्यामुळे यातील एकाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणणं मला पटत नाही.

 – कल्पिता शिंदे, विद्यार्थिनी

 

 

yogeshहा निव्वळ राजकीय डाव

देशाचा कारभार हा त्या देशाच्या राज्यघटनेवर अवलंबून असतो. कुठल्याही धर्मग्रंथावर नाही. सुषमा स्वराज या हिंदुत्ववादी विचारांच्या भाजपाच्या नेत्या असल्यामुळे पक्षाच्या नावाखाली राजकारण करताहेत. राष्ट्रीय गं्रथ असलाच तर तो फक्त देशाची राज्यघटनाच आहे.

– योगेश तांबे, विद्यार्थी

 

संकलन – समर देवकते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *