कडक उन्हाळा आणि मुसळधार पावसापासून मोठ्या प्रमाणावर आराम घेऊन हिवाळा येतो. असं असलं तरी, मोसमातील हा बदल अनेक मार्गांनी तुमच्या केसांवर परिणाम करू शकतो. म्हणूनच भयावह हिवाळी संकटांना हद्दपार करण्यासाठी तुम्हाला अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला भयानक अनुभवला सामोरं जावं लागेल.

वातावरणामध्ये थंडावा यायला सुरुवात झाली आहे आणि त्याबरोबरच वॉर्डरोबमधून गरम कपडे बाहेर येऊ लागले आहेत. असं असूनही गरम कपडे फक्त थंडे वार्यापासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करतात पण केसांचं नाही. अनेकजण हिवाळी शुष्कतेपासून बचाव होण्यासाठी त्यांच्या त्वचेची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. पण खूपदा केसांचं दुर्लक्ष होतं. लक्षात ठेवा हिवाळा तुमचे केस अव्यवस्थित करू शकतो आणि तुमचा टाळू ढपलेयुक्त आणि खाजयुक्त होऊ शकतो.

थंड हवामान तुमचे केस आणि टाळू यामधील आद्रता शोषून घेतं. त्यामुळे त्वचा ढपलेयुक्त होते, केसांत कोंडा जमा होतो आणि कमजोर केसांचे फॉलीकल्स होतात. तुमच्या केसांतील नैसर्गिक तेल निघून जातं, त्यामुळे तुमचे केस शुष्क आणि निस्तेज बनतात. पुष्कळवेळा, अत्याधिक मेदस्त्राव तुमचे केस चिकट बनवतो आणि त्यामुळे तुमच्या केसांमध्ये धूळ आणि केरकचरा चिकटला जातो, परिणामी तुमचे केस निस्तेज आणि कडक बनतात.

थंड हवामानामुळे तुमच्या त्वचेची छिद्रं आकुंचन पावतात, परिणामी बुरशी आणि सुक्ष्मजंतूंमुळे कोंडा, पुरळ आणि संसर्ग उद्भवतात. थंड हिवाळा केसांना इजा पोहोचवतो आणि त्यांना शुष्क आणि कुरळे बनवतो. दुभंगलेली टोकं आणि केस तुटणं या सामाईक समस्या झाल्या आहेत. कोंड्यासारख्या टाळूच्या समस्येमुळे केस गळतात आणि या मोसमामध्ये अधिक संकटांची भर घालतात.

यावर उपाय नाहीत असं नाहीय… होमियोपॅथीक औषधं तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर आणि शरीराच्या पुर्नस्थापन उर्जेवर कार्य करतात. यामुळे त्यांच्याकडून निरोगी राहण्यास मदत होते. म्हणून सर्वाधिक हिवाळी व्याधींसाठी उत्कृष्ट उपचार पर्याय यातून खुला होतो. होमियोपॅथी वैयक्तिक स्तरावर प्रिस्क्रिप्शन्स देऊ करते, जे तुम्हाला मोसमातील सर्वात वाईट स्थितींच्या विरुद्ध सामना करण्यास सहकार्य करते आणि तुमचे केस पूर्ववत करण्यात मदत करते. कॅलकॅरिया सल्फर ६3 ही गोळी शुष्क खपल्यायुक्त केसांसाठी आणि खाज कोंड्यासाठी दिवसांतून २ गोळ्या दोन वेळा घेता येऊ शकतात. तसंच अँटिडँड्रफ शॅम्पूने आठवड्यातून तीनदा डोकं धुणं आणि गरम पाण्याचीदेखील हा त्रास कमी करण्यासाठी मदत होईल. जर अत्यंत खाजयुक्त शुष्क कोंड्याचा त्रास होत असेल, तर सल्फर ३० नावाच्या ५ गोळ्या दिवसांतून एकदा घेण्यास सांगता येऊ शकतं. यामुळे कोंड्यामुळे होणार्या खाजेतून मुक्तता मिळेल. हिवाळ्यामध्ये, चिकट पिवळ्या रंगाचे फ्लेक्स आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रलय आणू शकतील. अशा परिस्थितीमध्ये काली-एस ६3-२ ही गोळी दिवसातून दोन वेळा घेतल्यास आराम पडू शकतो.

तसंच या मौसमात केसांची निगा राखण्यासाठी आणखीही काही उपाय आहेत. उदाहरणार्थ, न्हाणं आणि शॅम्पू लावणं… केस अतिशय काळजीपूर्वक धुवणं, एकदम जोराने न घासणं, जोर न लावणं, केस न ओढणं, जास्त काळजी घेऊन व्यवस्थित केस धुवणं, गरम शॉवर्स घेणं टाळणं किंवा गरम पाण्याने केस धुवणं टाळणं, कोमट शॉवर्स केसांसाठी उत्कृष्ट आहे. उकळलेलं गरम पाणी टाळू शुष्क आणि ढलपेयुक्त करू शकतं आणि केस कमजोर बनवू शकतं. म्हणूनच केसांना वारंवार शॅम्पू लावू नका. केस अतिरिक्त धुण्यामुळे केसांतील नैसर्गिक तेल जाऊ शकतं. थंड हवामानामध्ये, केस आणि टाळू दोन्ही लवकर वाळतात. केसांतील अतिरिक्त पाणी काही मिनिटं डोक्याला टॉवेल गुंडाळून शोषून घ्यावा. नंतर नैसर्गिक घटक असलेला नैसर्गिक शॅम्पू निवडून त्याने प्रथम पृष्ठभागावरील मळ हळुवारपणे धुवणे आणि फेस काढावा, पुन्हा टाळू आणि केसांच्या मुळाशी रक्त पुरवठा होण्यासाठी डोक्याला मसाज करावा. तसंच मळ स्वच्छ करणं आवश्यक आहे, कारण मळाच्या संचयामुळे केसांत कोंडा होऊ शकतो. केस कोमल आणि चमकदार ठेवण्यासाठी आंघोळीनंतर लिव्ह-इन हेअर कंडिशनर वापरल्याचा फायदा होऊ शकतो. ज्यांना नैसर्गिक कंडिशनर पाहिजे आहे, त्यांच्यासाठी नारळाचा रस उत्कृष्ट पर्याय आहे.

हिवाळ्यातील केसांच्या समस्या कमी करण्यासाठी आणखीही काही अतिरिक्त बाबी आहेत ज्या लक्षात घेणं गरजेचं आहे… धुम्रपान आणि मद्यपान केस कमजोर बनवू शकतात. योगा किंवा ध्यान, किंवा सौम्य भावपूर्ण संगीत यांसारख्या विश्रांतीच्या पद्धतींमुळे मात्र केसांना निश्चितच मदत मिळते. तसंच वारा आणि प्रतिकूल हवामान परिस्थितींपासून केसांचं संरक्षण करण्यासाठी स्कार्फ वापरणं हिताचं आहे. केस ओले असताना बाहेर जाऊ नये, कारण यामुळे केस दुभंगू शकतात. कलरिंग, पर्मींग, स्ट्रेटनिंग, आयरनिंग आणि क्रीम्पिंगसारख्या केमिकल उपचार पद्धती टाळाव्यात. केसांसाठी आणि त्वचेसाठी जीवनसत्व ई पोषणात्मक आहे. ५ बदाम आणि १-२ अक्रोड नियमितपणे खाल्ल्याने केसांना चकाकी येते… हिवाळ्यामध्ये मेहंदी वापरणं टाळावं. यामुळे केस अधिकच शुष्क बनतात. कोंडा आणि शुष्कपणा घालवण्यासाठी नैसर्गिक कोरफडीचा स्त्राव फारच उपयुक्त ठरतो.

डॉ. मुकेश बत्रा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *