रामपाल बाबाच्या अटकेनंतर त्याच्या मायावी आश्रमाची झडती घेण्यात आली. या झडतीत अतिशय धक्कादायक माहिती समोर येत गेली. यामुळेच रामपाल बाबाही भोंदूच असल्याचं उघडकीस आलं. पण रामपाल बाबाच्या अटकेमुळे समाजात पेव फुटलेल्या एकूणच बाबा-महाराजांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आसाराम बापूपासून अनेक बाबा-महाराज वादग्रस्त प्रकरणात अडकलेले आहेत. समाजाला अध्यात्म सांगण्याच्या नावाखाली हे बाबा-महाराज दुष्कृत्य करत असल्याचं आढळून आलंय. म्हणूनच अशा बाबा-महाराजांचं आता करायचं काय, असा प्रश्न विचारला जातोय…

 

 

 

 

 

 

 

charu बाबा-महाराज ही सामाजिक कीड

आज सर्वत्रच अनेक बाबाबुवांचा सुळसुळाट झाला आहे. सामाजिक आरोग्याला लागलेली ही एक कीडच आहे. सामान्य  माणसाची दिशाभूल करून श्रद्धेच्या नावाखाली एक प्रकारचा उद्योगच सुरू झाला आहे. त्यामुळे ‘गुरू’ या शब्दाची प्रतिमाच  ढासळली आहे. प्रत्येकाने जागरूक राहणं गरजेचं आहे. त्याशिवाय अशा समाजकंटकांना आळा बसणार नाही.

 – चारुश्री वझे, विद्यार्थिनी

 

 

vaikapiप्रत्येकाने जागरुक राहण्याची गरज

समाजातील सगळेच नागरिक मग ते सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, हे सारेच अशा प्रकारच्या भोंदू बाबांच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य अंधकारमय करून घेत आहेत. आतातरी प्रत्येकाने जागरूक राहण्याची गरज आहे, त्याशिवाय या भोंदू बाबांचा सुळसुळाट थांबणार नाही.

– वैकल्पी घरत, विद्यार्थिनी

 

 

priyanka बाबा-बुवांना मूर्ख बनवणं ठाऊक असतं

आज आपण २१ व्या शतकात असलो तरी सगळे लोक अशा भोंदू बाबांकडून फसवले जातात. या बाबा-बुवांना भारतीय  लोकांच्या मानसिकतेची नस चांगलीच माहीत झालीये. इथल्या लोकांना मूर्ख बनवणं किती सोपं असतं हे यांना चांगलंच  ठाऊक आहे, अशा भोंदूंना… म्हणूनच तर आसाराम, रामपालसारखे लबाडलांडगे आपल्या समाजात ठाण मांडून आहेत.

 – प्रियांका सोहनी, विद्यार्थिनी

 

 

suvijitविद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो

केवळ रामपाल बाबाच काय सर्व साधुमहाराजांचं ढोंग घेणार्या सर्व महाराजांवर कारवाई करायला हवी. रामपाल बाबासारख्यांच्या अशा कृत्यांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर फारच विपरित परिणाम होऊ शकतो. कारण या परिणामांमुळे प्रत्येक विद्यार्थी आपलं टॅलेंट रामपाल बाबासारखंच वापरण्याची जास्त भीती आहे…

– सुविजीत सावंत, विद्यार्थी

 

 

rohit शासनानेच रोखलं पाहिजे

अशा बाबां-बुवांना शासनानेच वेळीच रोखलं पाहिजे. या बाबांचे मठ सरकारी नियंत्रणाखाली असावेत आणि  समाजसेवेपलीकडील त्यांच्या सर्वच कृत्यांना सरकारने बंदी घालणं आता आवश्यक आहे.

 – रोहित अडसूर, विद्यार्थी

 

 

vishalबाबा-महाराजांचा कायमचा नायनाट करा

रामपाल बाबासारखे बाबा-महाराज हेच खरंतर समाजातील कीड आहेत. अशा किडीचा कायमचा नायनाट करणं तितकंच गरजेचं झालेलं आहे, असं मला वाटतं. यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणं आणि अशा बाबांना बळी न पडणं आवश्यक आहे.

– विशाल वाघ, विद्यार्थी

 

 

संकलन – समर देवकते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *