केरळमधील कोच्ची इथल्या प्रेमीयुगुलांनी तिथल्या तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या सततच्या मनमानीला कंटाळून मरिन ड्राईव्हवर किस ऑफ लव्ह नावाचं अभियान केलं. प्रेमभावना व्यक्त करण्यावर निर्बंध आणणार्यांच्या विरोधात हे अभियान आयोजित केलं गेलं होतं. मात्र पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आणि तिथूनच मग या अभियानाचे पडसाद देशभर उमटले. मुंबईतील आयआयटीमधील विद्यार्थ्यांनीदेखील किस ऑफ लव्ह अभियानाला पाठिंबा दर्शवत जोरदार निदर्शनं केली. दिल्ली, कोलकातामध्येही या अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळाला. मात्र तरीही समाजातील अनेक तरुणतरुणीेंना किस ऑफ लव्ह अभियान हे पाऊल टोकाचं वाटतंय. संस्कृतिविघातक म्हणूनही या अभियानावर टीका केली जातेय. कट्ट्यावरदेखील काहीशा अशाच प्रतिक्रिया उमटू लागल्यात…

 

 

 

 

 

bhushan कायद्याने वागायला हवं

आपल्या भारतीय संस्कृतिमध्ये अशाप्रकारे प्रेम व्यक्त करणं अशोभनीय आहे. जर आताच्या पिढीला पाश्चिमात्य  संस्कृती आपलीशी करावी असं वाटत असेल तर त्यांनी जरूर करावी. पण त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक  जाणिवही जोपासावी. अशी प्रकरणं कायदेशीररित्या हाताळणं गरजेचं आहे. पण पोलिसांनी कायद्याचा गैरवापर करू नये.

 –  भूषण किल्लेदार, विद्यार्थी

 

 

apruvaकिस करणं योग्यच! पण…

प्रेमामध्ये किस करणं योग्य आहे. मात्र आपण कुठे कोणती गोष्ट करतो यालादेखील महत्त्व आहे. सामाजिक आयुष्य जगताना अनेक बंधनं आपल्यावर लादली जातात. ती आपली जबाबदारीही आहे. त्यामुळे या अभियानाला विरोध असावा.

– अपर्णा जगताप, विद्यार्थिनी

 

 

samrudhi kadam संस्कृतिवर गदा आणणारं अभियान

अशा प्रकारच्या अभियानाला विरोध असावा. केवळ किस करूनच प्रेम व्यक्त करता येतं असं नाहीय. आपला समाज हा  संवेदनशील आहे. अशा प्रकारच्या संस्कृतिवर गदा आणणार्या घटना घडल्यावर अनेक संघटना त्या विरोधात उभ्या  राहतात. ते योग्यच आहे, असं मला वाटतं.

 – समृद्धी कदम, विद्यार्थिनी

 

 

dipti pawarसरकारनेच तरतूद करावी

किस ऑफ लव्ह या अभियानाला या समाजातील कुठलाच स्थर मान्यता देणार नाही. पण प्रेम युगुलांसाठीही शासनाने अशा काही खाजगी गोष्टी करण्यासाठी सोय करावी. त्यांनी काय करावं? सगळ्यांनाच अशा गोष्टी करण्यासाठी प्रायव्हसीची गरज असते. त्यासाठी विचारपूर्वक आणि ठोस निर्णय घेऊन सरकारने त्यासाठीची तरतूद करावी.

– दीप्ती पवार, विद्यार्थिनी

 

 

ajit ghag संस्कृतिचं जतन करा!

भारतीय कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणं हा गुन्हाच आहे. कोच्चीतील घटनेचे पडसाद देशभर पडून  अनेक संघटनांनी त्याला विरोध केला आहे. तो विरोध योग्यच आहे. आपल्या भारतीय संस्कृतिचं जतन करणं आवश्यक  आहे. या अभियानामुळे बालमनावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

 – अजित घाग, विद्यार्थी

 

 

ajitसमाजविघातक अभियान

आपली भारतीय संस्कृती अशा कित्येक घटनांची, पुरातन गोष्टींची साक्ष जरी देत असली तरी आपला समाज कधीच या गोष्टींना मान्यता देणार नाही. अशा गोष्टींकडे समाजविघातक म्हणूनच पाहिलं जाईल. म्हणूनच तरुणांनी अशा अभियानाच्या भानगडीत न पडता आपले सुखी संबंध जोपासावेत.

– अजित बागडे, विद्यार्थी

 

 

 

संकलन – समर देवकते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *