अभिनेत्री श्वेता प्रसाद बासू देहविक्री करताना रंगेहात पकडली गेली आणि सर्वत्र एकच गहजब झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये सापडणं ही बातमी कुणालाही धक्कादायक वाटावी, अशीच आहे. त्यामुळे श्वेताच्या या बातमीचीही जोरदार चर्चा सुरू झाली. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत सगळीकडेच श्वेताची बातमी आणि छायाचित्रं प्रसारित होऊ लागली. मात्र ज्या पैसेवाल्यांसोबत श्वेताला अटक करण्यात आली त्यांच्यापैकी एकाचंही नाव समोर आलं नाही किंवा त्यांच्यापैकी कुणाचाही चेहरा लोकांसमोर आणला गेला नाही. याउलट श्वेताने आर्थिक अडचणींमुळे या व्यवसायात प्रवेश केल्याचं स्पष्टपणे सांगितलं गेलं. श्वेताच्या या विधानामुळेच आता श्वेता नेमकी कुणाची बळी ठरली, हा प्रश्न निर्माण झालाय. झगमगत्या चंदेरी दुनियेची ती बळी ठरली की इथल्या एकूणच समाजव्यवस्थेची ती बळी ठरली…?

 

 

 

 

 

sheetal श्वेताची मजबुरी असावी…

श्वेताने हे कृत्य काही दबावामुळे किंवा तिच्या करिअरला खंड पडू नये म्हणून केलं असावं. तिच्या म्हणण्यानुसार  चित्रपटात काम मिळत नाही म्हणून तिने देहविक्रीचा मार्ग स्वीकारला. अशा किती मजबूर श्वेता या धंद्यात अडकल्या  आहेत हे शोधून त्यांना अडकवणार्या दलालांना योग्य ती शिक्षा केली पाहिजे.

 – शितल यादव, विद्यार्थिनी

 

 

bhavitaचमकत्या दुनियेची बळी

बॉलिवूडच्या चमकत्या दुनियेत टिकून रहायचं असेल तर उच्चभ्रू लाईफ स्टाईल लागतं. मॉडेलिंगसाठी शहरात येणार्या मुली सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेला भुलून जातात आणि हीच लाईफ स्टाईल टिकून राहण्यासाठी मग अनेकांकडून चुकीच्या पद्धतीचा अवलंब होतो. नेमकं हेच श्वेता प्रसादच्याबाबतीत घडलं असावं.

– भाविता जाधव, विद्यार्थिनी

 

 

priyanka इंडस्ट्रीतील व्यवस्थेची बळी

सिनेइंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच नावाचा प्रकार काही नवीन नाहीय. अनेक दिग्दर्शक मॉडेल्सना चित्रपटात काम देण्याचं  आमिष दाखवून त्यांचं शारीरिक शोषण करतात. अशा किती श्वेता या प्रकाराला बळी गेल्या असतील, ज्यांना या दुनियेत  जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या मुलींनी सावध राहून काम करणं गरजेचं आहे.

 – प्रियांका जाधव, विद्यार्थिनी

 

 

prakashबालूचं काय झालं?

श्वेताने स्वतःहून कबुली जरी दिली असली तरी कशावरून केवळ तीच या गोष्टीला जबाबदार असेल. श्वेताचा दलाल म्हणून काम करणारा बालू यालाही ताब्यात घेतलं गेलं आहे. तोच या गोष्टीचा पूर्णपणे उलगडा करू शकतो. पोलिसांनी या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लावून गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा द्यावी.

– प्रकाश खंदारे, विद्यार्थी

 

 

pranay श्वेता गैर वागली नाही

प्रत्येकाला आपलं आयुष्य कसंही जगण्याचा अधिकार आहे. श्वेतावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी होती. कितीही  सदाचाराचं आचरण करायचं म्हटलं तरी जगण्यासाठी पैसे हे लागतातच. त्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा हा  ज्याचा त्याचा प्रश्न. तिने अशा प्रकारच्या मार्गाचा अवलंब केला, त्यात गैर काय आहे…

 – प्रणय जळवी, विद्यार्थी

 

 

krunalश्वेताचा मूर्खपणा

आपल्या सिनेइंडस्ट्रीमध्ये असे अनेक वाद यापूर्वीही चर्चेत आले आहेत. आपलं ग्लॅमर जपण्यासाठी या अभिनेत्री अशा काही चुकीच्या पद्धतीचा अवलंब करतात. त्यांना आपल्या इज्जतीपेक्षा ग्लॅमरचंच जास्त पडलेलं असतं. मूर्खपणाचा कळस आहे या सिनेस्टार्स.

– कृणाल कदम, विद्यार्थी

 

संकलन – समर देवकाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *