‘ट्रायकोटिलोमेनिया’ म्हणजेच आपले स्वतःचे केस खेचून काढण्याची प्रवृत्ती. ही प्रवृत्ती प्रत्येकी १०० पैकी ४ लोकांमध्ये दिसून येते. यावर होमिओपॅथिक आणि वर्तणूक संबंधित उपचाराने योग्य ते उपचार केले जाऊ शकतात.

एक २१ वर्षीय विद्यार्थिनी जवळपास एका वर्षापासून केस गळण्याच्या समस्येने त्रस्त होती. तेव्हा तिच्या केसांची एका व्हिडिओ मायक्रोस्कोपीद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीत असं समजलं की, त्या विद्यार्थिनीची ही स्थिती ‘ट्रायकोटिलोमेनिया’मुळे झाली आहे. ही एक अशी पछाडणारी स्थिती आहे, जी काही लोकांमध्ये विकसित होते आणि ते आपले केस खेचून काढू लागतात. यामुळे केस तर जातातच, शिवाय यामुळे सामाजिक लज्जेलादेखील सामोरं जावं लागतं.

त्या विद्यार्थिनीच्या केसांच्या चाचणीनंतर डॉक्टरांना हळूहळू या स्थितीचा खुलासा होऊ लागला. ती विद्यार्थिनी घरी आपल्या पालकांमुळे खूपच निराश होती. कारण तिचे पालक तिच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह करू इच्छित होते. या गोष्टीचा त्या विद्यार्थिनीवर प्रचंड तणाव होता. तिला पुढे शिकायचं होतं. पण तिचे पालक आपल्या म्हणण्यावर ठाम होते. या प्रचंड दबावामुळे ती विद्यार्थिनी आपल्या इच्छेविरुद्ध लग्न करण्यासाठी तयार झाली. याच दरम्यान, तिला आपले डोक्यावरील केस खेचून काढण्याची आणि ते खाण्याचीदेखील विचित्र सवय लागली. तिला आपल्या तणाव आणि निराशेतून बाहेर पडायचं होतं. जेव्हा डॉक्टरांनी त्या विद्यार्थिनीला या सवयीबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं की, असं केल्याने तिला भावनात्मकदृष्ट्या सुटका मिळत असे…

‘ट्रायको’चा अर्थ आहे केस आणि ‘मेनिया’चा अर्थ आहे एक प्रकारचा मानसिक आजार. ही व्याधी मेंदूमध्ये उत्पन्न होते. पण यामध्ये रुग्ण स्वतःचेच केस नष्ट करण्याकरता उद्युक्त होतो. अधिकृतरित्या याला एक इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डरच्या स्वरूपात वर्गीकृत केलं जातं. ज्यामध्ये व्यक्ती एका प्रकारची स्वतःस हानीकारक अशी वागणूक दाखवू लागतो. अशाप्रकारच्या मानसिक आजारांच्या उदाहरणांमध्ये पायरोमेनिया (वस्तू जाळण्याची वृत्ती), क्लेप्टोमेनिया (सामान चोरण्याची वृत्ती), पॅथॉलॉजिकल गॅम्बलिंग, सक्तीची खरेदी इत्यादींचा समावेश आहे.

‘ट्रायकोटिलोमेनिया’ सामान्यतः बालपण किंवा किशोरावस्थेमध्ये झालेला दिसून येतो. पण, जास्तीत-जास्त लोक १७ वर्षं वयाच्या आधी यावर उपचार करून घेत नाहीत. कारण ते या समस्येपासून अनभिज्ञ असतात. सर्वात चित्तवेधक तथ्य हे आहे की, या रोगाच्या उपचाराकरता डॉक्टरांशी संपर्क साधणार्या रुग्णांमध्ये ७० ते ९० टक्के स्त्रिया असतात. मात्र ‘ट्रायकोटिलोमेनिया’च्या प्रसाराचं खरं कारण अद्याप ज्ञात नाही कारण रुग्णांची प्रवृत्ती अत्यंत गोपनीय असते. सामान्यतः या स्थितीचं कारण कोणत्याही प्रकारची चिंता हे असू शकतं. काही रुग्णांना आपले केस ओढल्याने शांतीही मिळते. जर ही वागणूक कायम राहिली, तर तणावाची जाणीव होण्याची वृत्ती वाढते आणि त्यानंतर जेव्हा केस उपटले जातात, तेव्हा एका प्रकारचं समाधान आणि सुटकेचा अनुभव मिळतो.

केस ओढण्याची सवय बर्याचदा आपसूक (सामान्यतः मुलांमध्ये) आणि विस्मरणाच्या अवस्थेमध्ये दिसून येते. वाचताना किंवा टीव्ही बघताना असं होऊ शकतं. ही सवय जाणूनबुजून पूर्ण एकाग्रतेनेदेखील निर्माण होऊ शकते. केस उपटणारे बरेच रोगी ते आपल्या हातात घेऊन खेळूही शकतात. काही लोक खातातदेखील आणि ते त्यांच्या पोटातदेखील जमा होतात. केसांचे हे गुंतलेले गोळे कधी-कधी ऑपरेशननेदेखील काढावे लागू शकतात. तथापि, केसांचे केस खेचून काढण्याची प्रवृत्ती कॉमन आहे. पण, त्याबरोबरच काही लोक भुवया, दाढी, पापण्या, छाती, पायांचे आणि जांघेचेदेखील केस ओढून काढू लागतात.

‘ट्रायकोटिलोमेनिया’च्या या गंभीर स्थितीमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. डोक्याच्या त्वचेमध्ये सतत आघात झाल्याने केसांच्या मुळांचं कायमचं नुकसान होऊ शकतं. जर केसांना खेचून काढल्यानंतर खाल्ले गेले तर त्यामुळे पोटामध्ये दुखू लागतं. असं चार वर्षांच्या मुलांमध्येदेखील दिसून आलं आहे. यामुळे एक सामाजिक असुविधादेखील निर्माण होते. एका अभ्यासानुसार, ‘ट्रायकोटिलोमेनिया’ने ग्रस्त २० टक्के लोक सुट्टीवर जाणं टाळू इच्छितात, २३ टक्के लोकांना आपल्या या सवयीमुळे नोकरीमध्ये व्यत्यय येत असल्याचं जाणवतं आणि २४ टक्के मुलं यामुळे अनेकदा शाळा चुकवतात.

‘ट्रायकोटिलोमेनिया’साठी आनुवांशिकतेचं लक्षण, तणाव जबाबदार असतात. याव्यतिरिक्त, अंतर्निहित उदासीनता आणि चिंतादेखील या समस्येचं कारण होऊ शकतं. या आजाराच्या उपचाराकरिता कोणतंही एफडीए-मान्यताप्राप्त उपचार नाहीत. पण, होमियोपॅथी यावर उपचार उपलब्ध करते. होमियोपॅथी केस उपटून काढण्याच्या अंतर्निहित वृत्तीला रोखण्याचं काम करतं. याव्यतिरिक्त, वागणूक संबंधित उपचाराला एक सहाय्यक पद्धती म्हणून स्वीकारलं जातं. ही थेरपीदेखील बरीच प्रभावी आहे. रुग्णांना आपल्या स्वभावावर देखरेख ठेवावी लागते आणि त्यांना केस खेचून काढण्याची सवय सोडण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. बाल रुग्णांच्याबाबतीत पालकांना सांगितलं जातं की, मुलांची केस ओढून काढण्याची वृत्ती ते नियंत्रित करू न शकत असल्याने त्यांना त्याबाबत दोषी न मानता ती सवय कमी करण्याची प्रेरणा त्यांना द्या…

– डॉ. अक्षय बत्रा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *