देशात मधुमेहाचं प्रमाण वाढत असून ती मोठी चिंताजनक बाब आहे. मधुमेहाचा शारीरिक क्षमतेप्रमाणे लैंगिक क्षमतेवरही विपरित परिणाम होतो. त्यावर कशी मात करायची हा प्रश्न असतो. या शिवाय नपुंसकतेमागील कारणं तसंच उपचारांबाबतही समाजात बर्याच प्रमाणात अज्ञान कायम असल्याचं दिसतं. या पार्श्वभूमीवर काही समस्यांना दिलेली उत्तरं.

 

मधुमेहाच्या विकाराचा लैंगिक सुखावर परिणाम होतो का?

मधुमेह झाल्या झाल्या कामशक्ती नष्ट होत नाही. साधारणतः चार-पाच वर्षांमध्ये ताकद हळूहळू कमी होते. या आजारावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, म्हणजेच पथ्यकर आहारविहार करत नाहीत, मनात येईल ते खातात त्यांची ताकद लवकर कमी होते. परंतु या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देतात, पूर्ण इलाज करतात, त्यांची ताकद काही काळ शाबूत रहाते. परंतु सर्वांच्याच शक्तिचा र्हास होतो आणि काळानुसार एक वय असं येतं जेव्हा व्यक्ती शरीरसंबंध करण्यास बिलकूल लायक राहत नाही. यालाच ‘मधुमेहजन्य पूर्ण नपुंसकता’  म्हणतात. डायबिटीसजन्य नपुंसकतेमध्ये काही पुरुषांना कामेच्छा (स्त्री संबंध ठेवण्याची इच्छा) अत्याधिक प्रमाणात होऊ लागते. कधीही, कोठेही सुंदर स्त्री, नग्न फोटो किंवा टीव्हीवर कामुक दृश्य पाहून मनामध्ये त्वरित आणि जास्त प्रमाणात शरीरसंबंधांची इच्छा होते. परंतु अशी व्यक्ती संबंध ठेवण्यासाठी अपयशी ठरते. काही पुरुषांमध्ये उत्तेजना उत्पन्न होते. परंतु ती कमी प्रमाणात असते. त्यामुळे ते पूर्ण शरीरसंबंध प्रस्थापित करू शकत नाहीत किंवा कामक्रियेपूर्वीच त्यांच्यामध्ये शैथिल्य येतं. काही मधुमेहग्रस्त व्यक्तिंमध्ये विशिष्ट वेळी उत्तेजना उत्पन्न होत नाही. तसंच संबंध बनवण्याची इच्छा असते तेव्हा उत्तेजना उत्पन्न होत नाही. परंतु इतर वेळी रात्री झोपताना किंवा पहाटे उत्तेजना उत्पन्न होते. त्याच वेळी लैंगिक अवयवात एक प्रकारची शिथिलता आलेली असते. काही व्यक्तिंच्या इंद्रियात कडकपणा येतच नाही. त्यामुळे संबंध सुरू होण्याअगोदरच धातुस्राव होतो. अत्यंत दुर्बलता असते किंवा अनेक वर्षांपासून जे मधुमेहग्रस्त असतात त्यांच्यात कधीकधी पूर्ण शिथिलता येते. त्यामुळे ते शरीरसंबंधांचा विचारसुद्धा करू शकत नाहीत. मधुमेहामुळे येणार्या नपुंसकतेवर इलाज करणं आणि त्यात यश मिळणं हे अत्यंत कठीण काम आहे. थोड्याफार प्रमाणात उत्तेजना शिल्लक असते त्यांना कधीकधी कमी-जास्त औषधी चिकित्सेने फायदा मिळू शकतो. परंतु ज्या पुरुषांनी मागील काही महिन्यांपासून अथवा वर्षापासून अजिबात शरीरसंबंध प्रस्थापित केलेला नसेल तर ते ‘व्ही पम्प’ नावाचं उपकरण वापरू शकतात. हे उपकरण आंतरराष्ट्रीय कंपनीमार्फत बनवलेलं असतं आणि या उपकरणामुळे कधीही शरीरसंबंध घडू शकतो. याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसतो आणि त्यासाठी औषध सेवनाचीही गरज नसते. याचा प्रयोग मधुमेही रुग्ण, हृदयरोगानेत्रस्त रुग्ण, किडनी पेशंट, रक्तदाबाने त्रस्त आणि अधिक वय असणार्या व्यक्ती सफलतापूर्वक करू शकतात. कारण हे उपकरण त्यांच्या नेमक्या मर्यादा लक्षात घेऊन बनवलं आहे. व्ही पम्पचा वापर करून रुग्ण अधिक सुखकर रितीने वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतो. मात्र त्याने संकोच, भीती मनातून काढून टाकून गुप्तरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा.

नपुंसकता ?हणजे काय? कशी दूर करता येईल?

लैंगिक संबंधांतील कमजोरीचा विचार करताना नपुंसकता म्हणजे काय, त्याबद्दल सामान्य माणसांना काय वाटतं हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. अशा प्रकारच्या समस्याग्रस्तांवर नामर्दपणाचा शिक्का सरसकट मारला जातो. एखाद्याला किरकोळ लैंगिक समस्या असेल तरी तो स्वतःला नपुंसक समजू लागतो. यावरून याबाबत समाजात किती गैरसमज आहेत ते लक्षात येईल. कधीही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही, अत्युच्चक्षणी स्खलन होतं असे पुरुष स्वतःला नपुंसक समजू लागतात आणि त्यांच्या मनात असफलतेची भीती निर्माण होते. त्यामुळे पुन्हा संबंध ठेवण्यासही ते घाबरू लागतात. शरीरसंबंधांपासून दूर पळू लागतात. त्यामुळे त्यांची समस्या सुटण्याऐवजी अधिक जटील होते. खरंतर वर उल्लेखण्यात आलेल्या समस्यांचा नपुंसकतेशी काहीच संबंध नाही. अशा प्रकारच्या समस्यांवरही आयुर्वेदात तोडगा उपलब्ध आहे. सहवासाच्या वेळी अजिबात उत्तेजना न येणं किंवा अपूर्ण उत्तेजना होणं याला नपुंसकता म्हणता येईल. अशा प्रकारच्या व्यक्ती आपली समस्या लपवण्याचा भरपूर प्रयत्न करतात. त्याबाबतची चर्चा ते कोणासमोरही करत नाहीत. समाजात या समस्येबद्दल असणार्या गैरसमजांमुळे असं होतं. नपुंसकता हा शारीरिक आजार न मानता अपशब्द किंवा शिवीच्या स्वरूपात वापरण्याची समाजाची मानसिकता आहे. तथाकथित मर्दानगीबाबत समाजाच्या असलेल्या विचारांमुळे असं घडतं. त्यामुळे नपुंसकता हा तुच्छ शब्द मानला जातो. त्यामुळेच अशा प्रकारच्या समस्येने ग्रस्त पुरुषांच्या मनात हीनभावना निर्माण होते. अशा समस्येने ग्रस्त पुरुषांनी संकोच न बाळगता, मनात कोणत्याही प्रकारचा किंतु न ठेवता या समस्येबद्दल तज्ज्ञांशी बोललं पाहिजे. ही समस्या लपवण्याचा प्रयत्न करावा तेवढी ती अधिक वाढते. आजच्या काळात शेकडा सात टक्के पुरुष अशा समस्येने ग्रस्त आढळतात. यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही. ही केवळ त्यांच्याशी संबंधित समस्या नसून संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. अशा प्रकारच्या समस्येने ग्रस्त पुरुष मनातल्या मनात झुरत राहिले तर ते मानसिक रुग्णही होऊ शकतात. प्रत्येक पुरुषाला आयुष्यात कधी ना कधी या समस्येचा सामना करावाच लागतो. फास्ट फूड, मानसिक तणाव, मद्यपान, नशिल्या पदार्थांचं सेवन अशा अनेक कारणांमुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. वाढत्या वयाबरोबर या सर्व गोष्टींचा परिणाम यौनसामर्थ्यावर होतो. या समस्यांवर आयुर्वेदिक औषधांचा वापर उपयुक्त ठरतो. त्यात वाजीकरण हा प्रभावी उपाय ठरू शकतो. प्राचीन काळापासून पुरुषांमध्ये ही समस्या आढळल्याने आयुर्वेदाने त्यावर उपाय सुचवले आहेत. वाजीकरण उपचारामुळे नष्ट झालेलं पौरुषत्व परत मिळू शकतं. आज बदलत्या परिस्थितीत या उपचारपद्धतीचा फायदा उठवायला हवा. अन्य औषधांप्रमाणे याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. मधुमेह, सिफलिस, मद्यपान अशा असंख्य समस्यांवर आयुर्वेदाने उपचार सांगितले आहेत. त्याचप्रमाणे नपुंसकतेवरही आयुर्वेदात विविध उपाय उपलब्ध आहेत.

अशा स्वरूपाच्या अनेकविध प्रश्नांवर योग्य मार्गदर्शनासाठी तसंच या संदर्भातील अधिक माहितीसाठी (०२२) २८०५३४३४, २४३३३४३४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 डॉ. अरुण कुमार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *