वैद्यकीय प्रशिक्षण, रुग्णाचं आणि डॉक्टरांचंही या महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल केईएम रुग्णालयात एक परिषद घेण्यात आली होती.

डॉक्टर म्हणून रुग्णांचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं ही आमची जबाबदारी तर असतेच पण त्याचबरोबर होतकरू डॉक्टर्स, नर्सेस, आधिभौतिकोपचार (Physiotherapy) इत्यादी अभ्यासक्रमांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची हातोटी आत्मसात करणं ही वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची गरज आहे.

शिकवणं ही एक कला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सांदिपनी ऋषिंच्या आश्रमात गोकुळातील बाळगोपाळांना धडे मिळाले तर एकलव्याने द्रोणाचार्यांकडून एकाग्रतेने आत्मसात केलेली विद्या त्याचा अंगठाच गुरुदक्षिणा म्हणून घेऊन गेली. चरक संहिता आणि अनेक आयुर्वेदातील ग्रंथ हे प्रकृती  ओळखून अचूक कोणती औषधी वापरायची हे सांगून जातात. पण १००च्या वर जाती, प्रजाती असलेल्या वनस्पतींतून नेमकी कोणती वनस्पती उपयुक्त आहे आणि ती कशी ओळखायची हे मात्र कसलेले आयुर्वेदाचार्यच सांगू शकतात. आधुनिक मेडिकल प्रशिक्षणात Simulators म्हणजेच आभासी विश्वात (Virtual) निर्माण केलेल्या प्रतिमा आणि मॉडेल्सवर अनेक अभ्यासक्रम तयार केलेले आढळतात. प्रत्यक्ष रुग्णावर प्रशिक्षण न देता, कृत्रिम मॉडेलवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण दिलं जातं. परंतु त्यातले बारकावे मात्र कसलेला शिक्षकच समजावून देऊशकतो.

प्रत्येक रुग्णाच्यामध्ये त्याच्या प्रकृतीनुसार औषधांचा परिणाम दिसतो कधी Effect पेक्षा ‘Side Effects’ त्रासदायक ठरतात आणि हे जोखण्याकरता उपलब्ध असलेल्या चाचण्या नेमक्या कधी आणि कशा वापरायच्या हे काम वैद्यकीय अध्यापनात येतं. कोणतीही चाचणी करताना त्यापासून मिळणारी उपयुक्त माहिती आणि ती चाचणी ‘Invasive’ स्वरूपाची असेल म्हणजेच उदाहरणार्थ, एखादी Biopsy. तर त्याची Risk किंवा धोके किती संभवतात त्याकरता त्याआधी घेण्याची नेमकी काळजी कोणती हे अंगवळणी पडण्याकरता प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना वेगवेगळे Protocol किंवा मापदंड घालून दिले जातात. पूर्वीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे चाचणीआधी घेण्याचा Informed Consent म्हणजेच पेशंटला चाचणीची पूर्ण माहिती समजावून सांगून मग त्यांची चाचणीकरता संमती घेणं.

ही प्रक्रिया योग्य तर्हेने पाळली असता रुग्णांचा सहभाग अथवा Patient Cooperation हे निश्चित अधिक चांगलं मिळतं.

कोणतेही दोन रुग्ण सारखे नसतात. आजार एकच असला, उपचारपद्धती सारखी असली तरी Risk आणि Recovery ही वेगवेगळी असते आणि यात रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर यांमधील ‘विश्वास’ हा महत्त्वाचा दुवा ठरतो. पेशंटना त्यांच्या आजाराची पूर्ण माहिती करून देणं हे रुग्णशिक्षण आणि डॉक्टरांना प्रशिक्षण देताना उपचार पद्धतीतील बारकावे समजावून सांगणं हे वैद्यकीय शिक्षण देणं महत्त्वाचं. यालाच Differential Diagnosis म्हणतात म्हणजेच एकाच लक्षणाची कारणं विविध असू शकतात आणि नेमकं कारण ओळखण्याकरता गणिती पद्धतीत वापरत असलेली Permutation Combination वापरून नेमक्या निदानापर्यंत पोचायचं असतं. गेल्या २० वर्षांत वैद्यकीय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडून आले आहेत. मात्र वैद्यकीय शिक्षणातील या बदलांना शिक्षकांच्या अनुभवाची जोडही तितकीच महत्त्वाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *