पोलिसांपासून लपत फिरणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू अखेर गजाआड गेला. स्वतःला निर्दोष म्हणवण्यासाठी आसारामने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाच हा कट असल्याचीही बतावणी केली. मात्र सत्य उजेडात आलंच आणि पोलिसांनी आसारामला अटक करून न्यायालयात हजर केलं. न्यायालयानेही आसारामला १४ दिवसांची न्यायालयीनकोठडी सुनावली. आश्रमातील एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली आसारामला ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. पीडित मुलीने पोलिसांकडे केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरूनच ही कारवाई करण्यात आलीय. त्या मुलीने आपल्या तक्रारारीत जे काही म्हटलंय ते केवळ भयंकर आहे. पीडित मुलीने आसारामवर केलेले आरोप प्रचंड गंभीर स्वरूपाचे आहेत.

पीडित मुलीने आपल्या तक्रारारीत त्या दिवशी अंधार्या खोलीत नेमकं काय काय घडलं? आसारामने त्या मुलीचं कसं लैंगिक शोषण केलं त्याची इत्यंभूत माहिती दिलीय. ही माहिती संताप आणणारी आहे. पीडित मुलीने म्हटलंय की, त्याने (आसाराम)ने खोलीतील (जोधपुरमधील आश्रमातील) लाईट बंद केली आणि मला आता बोलावलं. त्यांनी खोलीचं दार लावून घेतलं आणि माझ्यासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. जेव्हा मी ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि माझं तोंड बंद केलं. त्यांनी माझी चुंबनं घेतली आणि माझ्या शरीराच्या नाजूक अवयवांना स्पर्श करण्यास सुरुवात केली. यावेळी ते माझ्या संपूर्ण शरीराला स्पर्श करत होते आणि मला ओरल सेक्स करण्यासही सांगितलं. यावेळी ते पूर्णपणे नग्नावस्थेत होते. त्यांनी बळजबरी करत माझेही कपडे उतरवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला रडू आलं. मी रडू लागले. तेव्हा त्यांनी पुन्हा माझं तोंड बंद केलं आणि जवळपास एक तास ते माझ्यासोबत हे सारं करत राहिले. त्या एक तासानंतर जेव्हा मी खोलीच्या बाहेर जाऊ लागले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा मला धमकावलं आणि कुठेही या गोष्टीबद्दल तोंड न उघडण्याची ताकीद दिली.

बाबा बोलले – मी देव आहे. सगळं उद्ध्वस्त करून टाकेन…

त्या अल्पवयीन पीडित मुलीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारारीत असंही म्हटलंय की, स्वयंघोषित आसारामने त्या मुलीला तो एक शक्तिशाली पुरुष असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर त्याने स्वतःची तुलना देवाशीही केली. ही तुलना करताना आसाराम म्हणाला की, तो आजच्या काळातील देव आहे. त्यामुळे जर मुलीने त्या अंधार्या खोलीत जे काही घडलं ते बाहेर जाऊन कुणालाही सांगितलं तर तो तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकेल.

पीडित मुलीने तक्रारीत असंही म्हटलंय की, हा सगळा प्रकार जेव्हा घडला तेव्हा ती प्रचंड घाबरलेली होती. त्यामुळे त्या मुलीने तेव्हा कुणालाही या कृत्याबद्दल काहीच सांगितलं नाही. मात्र जेव्हा ती मुलगी आपल्या आईवडिलांसोबत उत्तरप्रदेशातील आपल्या घरी आली तेव्हा तिने ही सारी घृणास्पद हकीकत आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना सांगितली. मुलीच्या तोंडून ही धक्कादायक हकीकत ऐकल्यानंतर अखेर तिच्या पालकांनी १९ ऑगस्ट २०१३ रोजी दिल्लीच्या कमला मार्केट पोलीस ठाण्यात आसारामविरुद्ध रितसर तक्रार केली.

ती कशी पोहचली जोधपूरच्या आश्रमात?

आसारामच्या लैंगिक शोषणाची बळी ठरलेली ती पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील शाहजहाँपूर इथे राहणारी आहे. ती मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे असलेल्या आसारामच्या आश्रमामधील गुरुकुलमध्ये इयत्ता १२ वीत शिकत होती आणि आश्रमातीलच वसतिगृहात राहत होती. एकेदिवशी अचानक तब्बेत बिघडली म्हणून ७ ऑगस्ट २०१३ रोजी वसतिगृहाच्या वॉर्डने मुलीच्या आईवडिलांना उत्तर प्रदेशातून बोलावून घेतलं. मुलीचे पालक आश्रमात पोहचले तेव्हा त्यांच्या मुलीची तब्बेत बिघडली असल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. यासंदर्भात पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांना दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. पालकांनी पोलिसांना सांगितलं की, आश्रमातून त्यांना सांगण्यात आलं की, मुलीचं सिटी स्कॅन करण्यात आलंय आणि तिला भूताने झपाटलं असण्याची शक्यता आहे.

मुलीच्या तब्बेतीची खबर मिळताच दुसर्याच दिवशी तिचे पालक आश्रमात पोहचले. मात्र जेव्हा ते आश्रमात पोहचले तेव्हा त्यांना आपली मुलगी ठणठणीत आणि निरोगी असल्याचं लक्षात आलं. त्यावेळी आश्रमाच्या वॉर्डनने सांगितलं की, आसाराम बापूंनी तुमच्या मुलीसाठी मंत्र पाठवला होता. त्या मंत्रामुळेच तुमची मुलगी शुद्धीवर आली. इतकंच नाही तर वॉर्डनने त्या मुलीला आसारामच्या जोधपुरमधील आश्रमात घेऊन जाण्यासही मुलीच्या पालकांना सांगितलं. कारण तिथे आसाराम बापू स्वतः त्या मुलीसाठी काही धार्मिक विधी करणार होते. तसंच लवकरात लवकर मुलीला जोधपुरच्या आश्रमात घेऊन जाण्याची सक्तीदेखील वॉर्डनने केली असल्याची माहिती मुलीच्या पालकांनी पोलिसांना दिलीय.

यानुसार १४ ऑगस्ट २०१३ रोजी मुलीला घेऊन तिचे पालक आसारामच्या जोधपूर इथल्या आश्रमात पोहचले. यानंतर आसारामच्या सेवकाने राहण्यासाठी त्यांना एक खोली दिली आणि बापू मुलीवर उद्या धार्मिक विधी करतील असं सांगितलं. यानंतर पीडित मुलीने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, ती पीडित मुलगी १५ ऑगस्टच्या संध्याकाळी आसारामला भेटायला त्याच्या आश्रमात पोहचली. तेव्हा आसारामने त्या मुलीला खोलीत बोलावून घेतलं आणि तिच्या पालकांना खोलीच्या बाहेरच थांबायला सांगितलं.

यानंतरचा घडलेला प्रकार पोलिसांना सांगताना त्या पीडित मुलीने म्हटलं की, खोलीत गेल्यानंतर आसारामने प्रथम तर त्या मुलीच्या अभ्यासाची चौकशी केली. आणि बोलता बोलता तिला सांगितलं की, ती या संस्थेची प्र्रवक्ता बनू शकते. यानंतर आसारामने आपल्या सेवकाला सांगितलं की, या मुलीच्या पालकांना निरोप दे की, त्यांनी घरी निघून जावं. कारण धार्मिक विधीला खूप वेळ लागेल. इतकं बोलून आसाराम त्या पीडित मुलीला घेऊन खोलीत निघून गेला.

उपचारांच्या नावाखाली लैंगिक शोषण

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात चौकशी केल्यानंतर पोलिसांनी ही धक्कादायक माहिती उघड केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या पीडित मुलीला कोणताच आजार नव्हता. ती पूर्णपणे बरी होती. उलट कट रचूनच त्या मुलीला आसारामकडे नेण्यात आलं होतं. पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आश्रमाच्या वॉर्डनने आजारपणाचं निमित्त करून मुलीच्या पालकांना बोलावून घेतलं आणि मग भूत पिश्चाच्याची बाधा झाल्याची बतावणी करत त्या वॉर्डनने धार्मिक विधींच्या नावाखाली मुलीला आसारामकडे नेण्यासाठी पीडित मुलीच्या पालकांवर दबाव आणला. याचं कारण असंकी, छिंदवाडामध्ये तपासासाठी गेलेल्या पोलिसांच्या टिमला पीडित मुलीच्या आजारपणाबाबतची कोणतीच माहिती तिथे मिळाली नाही. तसंच ती मुलगी शिकत असलेल्या गुरुकुलच्या व्यवस्थापनानेही तिच्या आजारपणाचीकोणतीच माहिती ठेवलेली नाही, असं या तपासपथकाच्या निदर्शनात आलंय. याउलट त्या पीडित मुलीने आणि तिच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीला केवळ एक दिवसच चक्कर आली होती आणि याचाच गैरफायदा घेत उपचारांच्या नावाखाली आसारामने दैवी शक्तिचं कारण देत मुलीचं लैंगिक शोषण केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *