पेस्टिसाइड म्हणजेच कीडे, मुंग्या इत्यादींपासून बचाव करण्याकरता वापरण्यात येणारी जंतुनाशकं, परंतु ही जंतुनाशकं जर सतत संपर्कात आली अथवा एकदम फवारणी करताना अथवा रासायनिक खतांच्या कारखान्यासारख्या ठिकाणी त्याचा मोठा डोस तेथील कामगारांच्या संपर्कात आला तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि असं Accidental Exposure झाल्यास घ्यायची काळजी किंवा प्रथमोपचार हे कारखान्यात काम करणार्या प्रत्येक कामगारास माहिती हवेत.

साधारण लक्षणं ही डोसवर आणि काय तर्हेची Chemicals आहेत त्यावर अवलंबून असतात. त्याची लक्षणं अशी – कमी डोस म्हणजेच Mild Poisoning मध्ये डोळे चुरचुरणं, डोकंदुखी, तहान लागणं, भूक मंदावणं अथवा नाहिशी होणं, मळमळ, दमल्यासारखं वाटणं, झोप न लागणं इत्यादी लक्षणं दिसून येतात.

तर Moderate Poisoning किंवा मध्यम डोसमध्ये – उलट्या होणं, पोटात मुरडा अथवा Cramp येणं, धुसर दिसणं, नाडीचा वेग वाढणं, सैरभैर होणं अशी तीव्रतेनुसार लक्षणं सांगितली आहेत.

तर तीव्र डोस गेला असेल तर श्वसन अथवा श्वासोच्छवास थांबूही शकतो तर कधी दम लागतो. श्वासाची गती अधिक जलदही होऊ शकते. डोळ्याच्या बाहुल्यांचा आकार अगदी लहान दिसतो, तर बेशुद्धावस्थाही क्षणात येऊ शकते.

ही Chemicals आपल्या शरीरात कातडीतून जाऊ शकतात, श्वासोच्छवासातून फुप्फुसं आणि रक्तात मिसळू शकतात. तर कधी चुकून पोटात घेतली गेली तरीही त्रास संभवतो.

बहुतकरून कामाच्या ठिकाणी कातडीतून शोषण झालेलं असतं. आणि तर कधी एकदम अंगावर सांडल्यामुळे त्रास उद्भवू शकतो. अशावेळेस योग्य उतारा माहीत असेल तर त्याचा वापर करावा.

कपड्यांवर केमिकल पडलं असल्यास त्यातून आणखी शोषण होऊ नये म्हणून कपडे लगेच बदलावेत. पाण्याचा वापर करून १५-२० मिनिटं कातडी स्वच्छ धुणं आवश्यक आहे, डोळे धुणंही आवश्यक. Chemicals वरील Antidote अथवा उतारा माहीत असेल तर तो वापरावा नाहीतर लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना किंवा कंपनीमधील Safety Officer ला वेळ न घालवता दाखवून घ्यावं. केमिकलचा किती डोस त्रासदायक ठरू शकतो, हे केमिकलच्या तीव्रतेवर ठरतं. Lethal Dose अथवा LD50 म्हणजे ज्या डोसने ५० टक्के मृत्यू संभवतो असा डोस एखादं अतिशय Toxic Chemical देखील काळजीपूर्वक वापरलं तर त्याचा त्रास होणारही नाही तर तेच अगदी Mild केमिकल हे थोड्या थोड्या डोसमध्ये साठत राहिलं तर त्याचा जास्त त्रास होऊ शकतो.

शेवटी केमिकल्सचं Exposure हे कोणत्या मार्गाने झालं? किती डोस संपर्कात आला त्याची Toxicity काय आहे? ते किती लवकर शरीरातून काढून टाकलं गेलं? आणि ज्या माणसाला त्रास झाला त्याचं वय, सहनशक्ती इत्यादी काय आहे यावरून ठरतं. त्याला किती त्रास होईल ते तेव्हा पूर्ण माहिती करून घेणं महत्त्वाचं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *