डासांना मारायला किटकनाशक, झुरळं होऊ नयेत म्हणून Pest Control तांदूळ-गव्हात कीड लागू नये म्हणून बोरीक पावडर, शेती करतानाही पिकांवर रोग लागू नये म्हणून जंतुनाशकाची फवारणी आणि फळांना टिकावण्याकरता आणि पिकवण्याकरता विविध केमिकल्सचा वापर या सगळ्याचं सेवन करणार्या आपल्या सर्वांनाही त्याचा रोज थोडा डोस मिळतो! शीतपेयांच्या कोला आणि तत्सम पेयांतही जंतुसंसर्ग टाळायला आणि साखरेचं रंगयुक्त पाणी टिकायला घातलेली केमिकल्स ही या गटातलीच आणि मग त्यातूनच Organic शेतीचा जन्म. आपल्यातल्या किती जणांना आपण रोज वापरणार्या जंतू अथवा किटकनाशकाचे दुष्परिणाम माहिती असतात?

गेल्या आठवड्यात एका ऑफिसात काम करणारी ६ ते ७ मंडळी घसादुखी, डोकेदुखी, मळमळणं अशा तक्रारी घेऊन आली. शनिवारी पेस्ट कंट्रोल केला. रविवारी सुट्टी असल्यामुळे ऑफिस बंद होतं आणि सोमवारी कामाच्या घाईत ऑफिसात आल्या आल्या Window Airconditioner सुरू केला. दार, खिडक्या बंदच. ऑफिसात आल्या आल्या काहींना थोडा तर काहींना खूप जास्त वास जाणवला होता पण नंतर त्याच खोलीत बसून काम करायला लागल्यावर तो त्रास काहीसा कमी वाटला. मात्र संध्याकाळपर्यंत त्रासाची तीव्रता वाढली. पेस्ट कंट्रोलकरता Organophosphorus compounds वापरली जातात. त्यात Malathion, Fenthion आणि Carbonate Components असतात. त्याचा परिणाम श्वसनमार्गावर तर होतोच परंतु ती त्वचेतूनदेखील शोषली जातात. हे प्रामुख्याने शेतीकरता केल्या जाणार्या फवारणी करताना होतं. यासाठी नाकातोंडाला योग्य मास्क वापरणं आणि त्यानंतर काम झालं की अंघोळ करणं आणि सर्व कपडे बदलून टाकणं महत्त्वाचं ठरतं. फवारणी करताना वरून घालायचे कोरडे कपडे वापरले तर उत्तम आणि डोळ्यांकरता नंबर नसलेला चष्मा वापरावा, ज्यायोगे डोळ्यांना त्रास जाणवणार नाही. अशी फवारणी कशाप्रकारे करता येते याचं योग्य प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. काही जंतुनाशकांचं अपघाती Exposure झालं असता त्रास लगेच जाणवत नाही तर काही तासांनी तो सुरू होतो. म्हणून आपण वापरत असलेल्या जंतुनाशकांवरचा उतारा देखील माहिती करून घेतला तर उत्तम. अशा Chemicals ची मालवाहतूक करणार्या ट्रक आणि इतर वाहनांनादेखील हे वाहनांवर लिहिणं आणि वाहन चालकांनीही त्याबद्दलची माहिती करून घेणं अनिवार्यच नव्हे तर उपयुक्त आहे. कारण आपत्कालीन परिस्थिती ठरवून निर्माण होत नाही. परंतु त्यासाठीचं नियोजन मात्र आधीच करायला लागतं. टँकर उलटला, गळती झाली या क्वचित घडणार्या गोष्टी असल्या तरी जे लोक अशा तर्हेच्या घातक पदार्थांच्या संपर्कात येतात त्यांनी त्याची शास्त्रोक्त माहिती करून घेणं केव्हाही उपयोगी पडतं.

या विविध Industrial Material ना HR म्हणजे Hazard Rating दिलेलं असतं, ज्यायोगे धोक्याची तीव्रता ओळखता येते. ‘D’ अक्षर हे एखाद्या केमिकलची पूर्ण माहिती उपलब्ध नसेल तर वापरलं जातं. तसंच ते Chemical ज्वालाग्रही आहे किंवा नाही हेही लिहिणं आवश्यक असतं. अचानक एखादं Exposure झालं असता कशी काळजी घ्यायची याची माहिती आधीच घेतलेली बरी. निदान Industry कामाच्या ठिकाणी कशी काळजी घ्यावी ते पाहू पुढील आठवड्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *