डॉक्टरमंडळींच्यात क्षयरोगाचं प्रमाण अधिक आढळतं का? आपल्या देशातील क्षयरोगाच्या रुग्णांची एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारी बघितली तर एकूण डॉक्टर्समध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जवळजवळ तितकंच आहे. तरीही कोणत्याही संसर्गजन्य आजाराचा धोका त्या पेशात काम करणार्या व्यावसायिकांना राहतोच.

कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणातील धूर, धूळ इत्यादींमुळे झालेल्या फुप्फुसाच्या आजारांना व्यवसायजन्य फुप्फुसाचे आजार (Occupational Lung Disease) म्हणतात. ते मुख्यत्वे Silica, Asbestos कोळसा, धूळ (Dust) इत्यादींमुळे अथवा त्यातून निर्माण होणार्या तंतुं (Fibre) मुळे होतात.

उदाहरणार्थ, पिठाच्या गिरणीत जे कामगार काम करतात त्यांना फुप्फुसाचा आजार आढळतो. पीठ दळताना जो मोठा जात्यासदृश Grinding Stone वापरला जातो, त्याला rough करण्याकरता छिन्नीने ‘टाकी’ लावली जाते. हे काम करत असताना जर का दगडाची धूळ नाकातोंडात गेली तर सिलिकोसीस हा आजार पिठाच्या गिरणीत काम करणार्या जवळजवळ ३४ टक्के कामगारांमध्ये दिसून येतो. तसंच Asbestos हा ब्रेक लायनर्स, आगीपासून संरक्षण करण्याकरता वापरण्यात येणारी सामग्री, अॅसबेसटॉसचे पत्रे, बोटी इत्यादी अनेक उद्योगांत वापरण्यात येतो आणि या ठिकाणी काम करणार्या कामगारांना अॅसबेसटोसीस होऊ शकतो. यात फुप्फुसाचा कॅन्सर Mesothelioma चा देखील समावेश असतो.

भारतात प्रामुख्याने शेतीच्या व्यवसायात आरोग्याच्या विविध समस्या आढळून येतात. शेतीच्या कामात खतं वापरताना, कंपोस्ट खताचा ढीग उपसताना फुप्फुसाचा आजार उद्भवू शकतो. तो वेळीच ओळखून त्यावर उपाय करणं महत्त्वाचं. रासायनिक खतांची फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यास Malathion, Fenthion, §ˆØæÎè Organophosphorus compound मुळे फुप्फुसांना सूज येऊ शकते. तसंच धान्याच्या तूसाने काहींना अस्थमा बळावू शकतो. चुलीच्या तसंच लाकूड, पालापाचोळा यातून निर्माण होणार्या धुराने ब्राँकायटिस बळावतो.

केमिकल फॅक्टरीमध्ये काम करणार्यांना विशेष काळजीची गरज असते. या ठिकाणी अपघात टाळण्याकरता योग्य उपाययोजना आणि प्रशिक्षण देण्यात येतं. तरीदेखील क्लोरिनसारख्या वायुच्या संपर्कात आल्याने अचानक खोकला, छाती दाटून येणं आणि फुप्फुसाला सूज येणं (Pulmonary Oedema) असा त्रास होऊ शकतो. यासाठी प्रशिक्षणांतर्गत तिथे वापरण्यात येणारे मास्क कसे वापरावेत हे सांगितलं जातं. केमिकल प्लांटमध्ये काम करताना जर का त्रास झालाच तर safety officer  मार्फत योग्य तो उतारा कामाच्या ठिकाणी उपलब्ध असायला हवा. याबद्दलची माहिती NIOSH (The National Institute for Occupational Safety and Health) देण्यात येते. यातील काही आजार compensable या गटात मोडतात. त्याचं निदान कसं केलं जातं ते पाहू पुढच्या आठवड्यात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *