मागील आठवड्यातील अंकात ‘भरकटलेली वारी’ या मथळ्याखाली अभ्यासक संजय सोनावणी यांनी लिहिलेला विशेष लेख प्रसिद्ध झाला. या लेखावर महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींना हा लेख निषेधार्ह वाटला. तर काही वाचकांना त्यातील सत्यता पटली. याबाबत ‘कलमनामा’ कार्यालयात सतत फोन घणघणत होता. वाचकांनी पत्राद्वारे पाठवलेल्या या काही प्रतिक्रिया…

वारकरीद्वेषी लिखाण

वारकरी संतांनी मराठी साहित्याला नेहमी बळच दिलं आहे. ज्ञानेश्वरी हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आजही अनेक वारकरी संत भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ त्यांची लेखणी झिजवत असताना वारकरी संप्रदायावर मनमानी आरोप करणार्या संजय सोनवणी यांच्या बुद्धीची कीव करावी, तितकी अल्पच आहे!

सातव्या शतकापासून मुघलांनी हिंदुंवर आक्रमण सुरू केलं. तेव्हापासून हिंदू धर्माची पताका फडकवत ठेवण्याचं कार्य वारकरी संप्रदायाने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला बळ देण्याचं कार्य संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या वारकर्यानेच केलं होतं. समतेची खरी शिकवण वारकरी संतांनीच समाजाला दिलेली असताना समतेचा ठेका घेतल्याचा आव आणणारे संजय सोनवणी यांच्यासारखे धर्मद्रोही लेखकच समाजात विषमता पसरवत आहेत!

संजय सोनवणी लिहितात, पौंड्र वंशातील म्हणून पौंड्रंक विठ्ठल, ज्याचा कौलौघात झाला पांडुरंग विठ्ठल. या पौंड्र लोकांचा देव शिव! ‘हर’ या पुरातन शिववाचक शब्दाला गाडण्यासाठी ‘हरी’ हा नवाच शब्द शोधला गेला वगैरे…

विठ्ठलाविषयी अज्ञान मूलक टीका करणार्या सोनवणी यांना त्यांच्या या शोधाविषयी पारितोषिकच दिलं पाहिजे! विष्णू या संस्कृत शब्दाचं कानडी अपभ्रष्टरूप बिट्टी होतं. त्यातून विठ्ठल हा शब्द सिद्ध झाल्याचं डॉ.रा.गो. भांडारकर यांचं म्हणणं आहे. डॉ.भांडारकर आणि चि. वि. वैद्य यांच्यामते विष्णूचा विठ्ठु असा अपभ्रंश आर्य-प्राकृत भाषानियमानुसार होतो. ह.भ.प. विष्णुबुवा जोग यांच्यामते विचा केला ठोबा, या तुकारामांच्या अभंगानुसार वि-विद् म्हणजे जाणणं किंवा ज्ञान आणि ठोबा म्हणजे मूर्ती; म्हणूनच विठोबा म्हणजे ज्ञानमूर्ती होय.

– वर्षा ठकार

अध्यात्मातील सत्य समजून घ्यावं

आपल्या साप्ताहिकातील वारकरी संप्रदायावर केलेली टीका माझ्या वाचनात आली. ‘लोक एकत्र येतात, त्यात एकात्मकता नसून एक झुंड असते… इत्यादी’. त्या लेखाचा मी मनापासून निषेध करते! मी एक धर्माभिमानी हिंदू स्त्री असून मला माझ्या हिंदू असण्याचा सार्थ अभिमान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला विठोबा आम्हा सर्व हिंदुंच्या हृदयातच निवास करतो. आमच्या वारकरी संप्रदायावर टीका करण्याचा अधिकार कुणालाच नाही. वर्षानुवर्षं सुरू असलेल्या या आनंद सोहळ्याचा आपण कधीतरी अनुभव घेतला आहे का? आपण स्वतः कधी वारीतून काही मैल अंतर तरी चालला आहात का? मी घेतलाय तो आनंद. सर्व जाती आणि भेदभाव यांना विसरून जो आनंद विठ्ठलाच्या नामात मिळतो त्याची तुलना इतर कोणत्या वैभवाशी होऊच शकत नाही.

आपण पण महाराष्ट्रीय असून माझे बांधवच आहात असं मी मानते. कृपया वारीवरती टीका करून विठ्ठलाचा रोष ओढवून घेण्याचं पाप होऊ देऊ नका अशी विनंती. अध्यात्मातील सत्य काय ते समजून घ्या.

– अदिती दाणी, मुंबई.

रोखठोक आणि तटस्थ विश्लेषण

भक्तिमार्ग हाच मुळात मानवाच्या प्राथमिक अवस्थेतील दुःख, तणाव, भीती घालवून तत्कालिन अशिक्षित (अविकसित मन) मानवी जीवन सुरळीत चालवण्याचा एक प्रयत्न आढळून येतो. तो किती योग्य अयोग्य ही गोष्ट वेगळी. पण त्याही पुढे जाऊन मानवाच्या जाणिवा विकसित करण्याचे जे मार्ग झाले, त्यात या जुन्या झापडबंद मार्गांच्या अर्ध्वयुनी सोनवणीसरांनी म्हटल्याप्रमाणे प्रबोधनाऐवजी अडथळेच आणले आहेत. नव्हे ती त्यांची गरजच होऊन बसली आहे. जैन, बौद्ध धर्म वगळता सर्वच धर्ममार्गांनी ईश्वर केंद्रित भक्तिमार्गात सर्वच खंडातील लोकांना अडकवून ठेवलं. परिणामी मानवी मन आणि निसर्ग संबंध, यांवर संशोधन, त्यानुसार आचरण याबाबतच्या जाणिवा विकसित करण्याची वृत्तीच मारून टाकली. मानवात मुळातच नैसर्गिकतेने मानवतेच्या जाणिवेच्या प्रेरणा पुरेपूर आहेत. परंतु या जाणिवा न्यायबुद्धी, समत्व, साक्षीभाव इत्यादीचा सोयीनुसारच गैरवापर झालेला आहे. म्हणूनच आता भक्तिमार्गाच्या किती आहारी जायचं हे समजदारांनी ठरवायचं आहे. नव्हे मध्यममार्गानेच हा समाज जातो आहे. एक मात्र नक्की, कुठल्याही ग्लोबच्या टोकांवर/कडेला गती कमी असते. तर मध्यभागी परिवर्तनाची काळ यांची गती नेहमीच अधिक आढळते. तसंच या कट्टरपंथी मार्गीयांचं होत आहे. परंतु सोनवणी सरांचं एवढं रोखठोक आणि खरं समत्वाने तटस्थपणे विश्लेषण करण्यासाठी अभिनंदन! आमच्यासारख्या बर्याच समविचारी लोकांना हे वाचून समाधान वाटतं आणि नव्या विषयांची आम्ही वाटच पाहत असतो. आपल्या सर्वांच्या पुढच्या पिढ्यांसाठी ही परिवर्तनाची प्रबोधनाची पहाटच मी मानतो.

– अभय, वांद्रे

Vari And Samata

All knows that “Varkari Sampraday” has been based on Samata principle. This principle also adopted in our constitution. But all knows that politicians never adopted it. Hence they established different laws for different communities. Isn’t it communism? Is it “Samata”

for example, We always say Kashmir is integral part of India. Then why has it been isolated from constitution? Reservation Policy is based on community. Do you think this is so called “Samata”?

Do you have dare to write  articles on these issues? You may have acquired knowledge about “Varkari Sampraday” from unreliable sources. You must go through various “Granths” of Saints of Varkari Sampraday. Do study it deeply. They are filled with great spiritual energy, Samata, Bandhuta. Only then you will realise the spiritual source behind “Vari”.

Regards,

          Nilesh M. Pawar

वारी म्हणजे स्वतंत्रतेची पूर्तता

सोनावणी, जागेवर बसून वारीबद्दल बोलत आहेत की वारी प्रत्यक्षात केली आहे? वारीत समतेची शिकवण असल्यामुळे आज सर्व जातीचे लोक त्यात सामील होतात. फडकरी, महाराज मंडळी म्हणजे वारी नाही. हा वैष्णवांचा सुखाचा मेळा सनातनवाल्यांना रुचणारा नाही म्हणून तर पुण्यात गणपतीपुढे अथर्वशिर्षाची प्रथा वाढत चालली आहे. लोकमान्यांना वारीसारखी प्रती परंपरेची अपेक्षा होती म्हणून तर त्यांच्या संकल्पनेचं बीज म्हणजे आजचा राजकीय अड्डा असलेला गणपती उत्सव. वारी आणि आपल्याला दिसणारे वारकरी यात भेद आहे. किर्तनकार, प्रवचनकार म्हणवणारी मंडळी स्वतः वारकरी कुठे आहेत? वारीमधील परिवर्तनाची अपेक्षा तुमच्यासारख्या सुज्ञ माणसांकडून करायला हरकत नाही. परंतु तुम्ही पुढाकार घेतला तर? कंटाळा येणं स्वाभाविक आहे. अजून तरी ८०० वर्षं वारीचा कंटाळा वारकर्यांना आला नाही आणि आजच्या या कथाकथित भोंदू महाराजांमुळे आजचं वारीचं स्वरूप नाही तर तुकोबांच्या अभंगाचं मूर्त स्वरूप आहे. वारकर्यांबद्दल आपली विधानं बरोबर आहेत. परंतु ते वारीच्या परंपरेला लागू होत नाही. निगेटिव्ह पाहण्यापेक्षा चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. सोनावणी उलट अंगानी थोड्याच गोष्टींचा उल्लेख करून परंपराच खंडित करताहेत. ठीक आहे, वारीचं वैदिकीकरण ( राजकारण+अर्थकारण+भोगविलास= वैदिकीकरण) झालं असेल. परंतु मनुष्याने मनुष्याच्या सुखासाठी हा सोहळा वाढवला आहे. आपल्या ‘आडनावा’शी आपण बांधील असतो ही परंपरा तर ८०० वर्षं महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेली आहे. तीच आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अंगाची अविभाज्य घटक बनली आहे. देवत्व कुठे आढळत नाही परंतु त्याची अनुभूती अशा विशाल भव्य स्वरूपात अनुभव करण्यास हरकत नसावी. सांस्कृतिक अधःपतन वारीमुळे होत असेल तर ते ब्राह्मण समाजाचं होत आहे. कारण इथे पुजार्यांविना चाललेली धारा आहे. या वारीला पंडिती आश्रय नाही. लोक स्वतःच्या सुखासाठी प्रवास करतात. त्यांना कुठे तुमच्यासारखं तत्त्व माहिती असतं? देव धर्माच्या नावावर एकत्र झालेल्या जनसमुदायाला सामाजिक भान देण्याचं महान कार्य महाराष्ट्रातील संतांनी १३व्या शतकात करून सामाजिक क्रांतिची ज्योत पेटवली. या क्रांतिला वैचारिक वळण ज्ञानेश्वर महाराजांनी लावलं आणि परिपूर्णता तुकाराम महाराजांनी आणली. आजची दिसणारी वारी ही त्या क्रांतिचं फळ आहे. हे फळ व्यक्तिस्वातंत्र्याचं प्रतिक आहे. सामाजिक बांधिलकी जपून वैयक्तिक स्वतंत्रतेची पूर्तता म्हणजे वारी होय.

– अमर दांगट

मानापमानाचा खेळ

काही गोष्टी बरोबर आहेत. माझी काकू अनेक वर्षं वारी करते. मी पण स्वतः दोन वेळा तिच्याबरोबर थोडा गेलो होतो. पण तिथले मानपान बघून सर्द झालो आणि नंतर जाणं बंद केलं. लहानपणी फार ओढ होती पण जे काही प्रत्यक्ष बघितलं त्यामुळे भ्रमनिरास झाला. पण तुमचं वैदिक आणि अवैदिक फारसं पटत नाहीये अजून. म्हणजे तसं असू शकेल पण इतक्या सहजतेने ते झालं आहे याचा अर्थ काहीतरी कुठेतरी आधीच्या गोष्टींचा लोकांना तिटकारा असला पाहिजे. बाकी अभ्यास नसल्याने जास्त बोलणं बरोबर नाही.

माझी दिंडी आधी का तुझी आधी यावरून भरपूर वाद पाहिलेत. माझं किर्तन आधी का तुझं. तिथेही मान ठेवला पाहिजे. काय आहे की आपल्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसांचा मान ठेवला पाहिजे असं सांगितलं आहे. पण जेव्हा कर्तृत्वापेक्षा फक्त मी मोठा आणि वेगळ्या जातीचा मग तो ब्राह्मण असो वा अजून कोणी असो असं होतं तेव्हा वैताग येतो. दिंडीबरोबर चालणारे खरोखर किती भक्तिभावाने येतात हा प्रश्नच आहे. पण असं म्हटलं की राग येतो. मग आठ शतकांची यात्रा वगैरे इमोशनल गोष्टी होतात.

– चैतन्य

अवैदिकांनीही वेदांचा अधिकार मिळावा?

स्वतःच्या फायद्यासाठी वैदिक जर अवैदिकांच्या देवतांना स्वीकारत असतील तर अवैदिकांनीही वेदांचा अधिकार मिळवायला हरकत काय आहे? वैदिकांनी जर अवैदिकांच्या हक्कांवर अतिक्रमण केलं असेल तर आता अवैदिकांनीही वैदिकांच्या हक्कांवर अतिक्रमण करायला हवं.

– निनावी

इ?तार पार्टी का नाही खटकत?

किर्तनकार म्हणजे क्लासवाले असं तुमचं म्हणणं आहे. मग जे तथाकथित समाजसुधारक कार्यक्रमांना येतात, तेव्हा पाकीट घेतात किंवा लेखनाच्या बदल्यात मोबदला मिळवतात त्यांना काय म्हणावं? नुसतं दुरून निरीक्षण करणं आणि त्यात सामील होऊन निरीक्षण करणं यात फरक असतो आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची पूजा तुम्हाला खटकते मग हेच सारे लोक इफ्तार पार्टी अथवा इतर कार्यक्रमांना जातात ते नाही का हो खटकत? तुमचं म्हणणं आहे की धनगरांचा देव हायजॅक केला. अहो, पण वैदिकांनी त्याला मोठं केलं ना. त्यामुळे एक सामाजिक समरसता आली ना? ती नको आहे का तुम्हाला? का शैवानी शिव पूजा, वैश्वांनी विष्णू पूजा असंच चालू द्यायचं आहे का तुम्हाला?

– हर्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *