पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्रातर्फे मुंबईतील वेगवेगळ्या विभागात हवेतील प्रदूषणामुळे होणार्या आजारांचा अभ्यास आणि उपाय शोधणं हे काम केलं जातं. पावसाळ्यात हवेचं प्रदूषण मर्यादित रहातं. मात्र गेल्या पाच वर्षांत मलेरिया आणि डेंग्यूने आपल्या पर्यावरणाचा आरोग्यरक्षणाशी किती जवळचा संबंध आहे, हे दाखवून दिलं आहे.

मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीसच ‘मुंबई आरोग्य अभियाना’मार्फतपालिकेने नागरिकांकरता ठिकठिकाणी सूचनाफलक लावले आहेत. तरुणपिढीचं लक्ष वेधून घेणारी Fight The Bite ही पोस्टर्स ताप अंगावर काढू नका याची माहिती देत आहेत आणि खरोखरच आपण सर्व नागरिकांनी मिळून संघटित प्रयत्न केले तर मुंबईतलंच काय पण संपूर्ण देशातील ‘मलेरिया उच्चाटन’ निश्चित शक्य होईल.

एवढासा एक कीटक, हिंदीतील म्हणीनुसार ‘वो तो क्या मच्छर है!’ मधील ‘मच्छर’ हा जीव घेण्यास कारणीभूत ठरू शकतो आणि त्याकरता त्याचं समूळ उच्चाटन हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग ठरतो आणि ही वाट जाते ती आपल्या परिसरातून. हॉस्पिटल गाठायलाच लागू नये याकरता प्रत्येकाने आपल्या परिसराची योग्य तर्हेने काळजी घेतली, स्वच्छता राखली तर मला वाटतं ‘आरोग्य अभियान’ खरोखरीच ‘निरोगी मुंबई आणि स्वस्थ भारत’चं आव्हान पेलू शकेल.

आरोग्यशास्त्रात मलेरिया या आजाराच्या चक्रव्यूहातून बाहेर पडल्यानंतर मूळ भेद करायला हवा तो ‘डासांच्या व्युत्पत्तीचा’ अर्थातच Breeding चा इन मीन ‘दहा’ दिवसांत डास आपली Life Cycle पूर्ण करतात. म्हणजेच डबक्यात किंवा अगदी रस्त्यालगतच्या खड्ड्यात अथवा घरात अडचणीला कामी येईल म्हणून भरून ठेवलेल्या पिंपात, बादलीत साठलेलं किंवा साठवलेलं पाणी डासांना अंडी घालायला पुरेसं ठरतं. स्वच्छ पाणी, मातीयुक्त पाणी दोन्हीतही डासांच्या अळ्यांची (Larve) वाढ होते. तेव्हा दर आठवड्यातून एका दिवशी घरातील प्रत्येकाने घराच्या भोवतालीच्या एका दिशेला दीड ते दोन किलोमीटरच्या परिसरातील अशा जागा शोधायला आणि त्या स्वच्छ करून, Breeding Sites नष्ट करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं आपण नक्कीच मलेरियामुक्त होण्याकरता महत्त्वाचा वाटा उचलू शकतो. कारण डासांच्या बहुतेक जाती या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत उडू शकतात. तेव्हा आपण रहात असलेल्या परिसरातील सभोवतालच्या दोन किलोमीटरचा परिसर आपण डासांपासून मुक्त करण्यात हातभार लावू शकतो. यात Environmental Modification आणि Environmental Management For Vector Control याबाबत माहिती घेणं आवश्यक ठरतं. मलेरियाचं उच्चाटन करण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो, कोणते उपाय योजू शकतो यासंदर्भात पुढील भागात चर्चा करूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *