हेडफोन्स हे साधारण १९९० पासून सर्रास वापरले जाऊ लागले. विमान प्रवासात आपल्याला हवा तो कार्यक्रम हव्या त्या भाषेत सहज पहाण्याबरोबर ऐकताही यावा म्हणजे लांबवरचा प्रवासही झटकन संपला असे वाटे! त्यानंतर आले Hands Free म्हणजे मोबाईल फोन बरोबर वापरण्याचे Earphones आणि आता साधारणतः २० ते २५ टक्के मुलं वापरताना दिसतात ते MP-3  किंवा तत्सम इतर उपकरणाबरोबरच गाणी ऐकायला जाता-येता वापरण्यात येणारे Head phone किंवा ear phones. एकीकडे आजूबाजूच्या माणसांना आवाजाचा त्रास नाही हा फायदा तर दुसरीकडे अनेक तोटे! अगदी रस्त्यातून चालताना वाढलेल्या आणि घडलेल्या अपघातापर्यंत. आपल्याला निसर्गनिर्मित शरीररचनेत डोळे चेहर्यावर पुढे आणि कान डोक्याच्या बाजूला दिले आहेत. कोणतंही काम करताना पंचेंद्रियं एकवटून काम केल्यास एकाग्रतेने कामातील कुशलता वाढते. पण तेच एकाचवेळी एकापेक्षा अधिक गोष्टी करायला गेल्यास त्या कामाला लागणारा वेळ तर वाढतोच पण कामात चुका होण्याची शक्यताही वाढते.

आरोग्यशास्त्रात विशेषतः ऑपरेशन थिएटरमध्ये या संकल्पनेला अधिक महत्त्व आहे. तिथे प्रत्येक माणसाला एक काम नेमून दिलेलं असतं. एक जण लागणार्या Instruments ची यादी तपासून ती जागेवर लावतो तर दुसरा लावणारे Sterlised कपडे तपासण्याचं काम करतो. नर्सेसवर असणारी जबाबदारी तर लाखमोलाची! लागणारी औषधं, रक्तस्त्राव थांबवण्याकरता वापरली जाणारी आयुधं एक ना अनेक पण यात प्रत्येकजण आपलं काम समजून प्रशिक्षण घेऊन एकावेळेस एकच काम करत असतो आणि हेच नेमकं जिकिरीची शस्त्रक्रियाही लीलया पार पाडताना उपयोगाचं ठरतं. तिथे Multitasking बिलकूल चालत नाही आणि तसंही Multitasking मुळे दोन्ही कामात गोंधळ उडू शकतो.

काही दिवसांपूर्वीचीच बातमी, मुंबईत दादरला घडलेल्या अपघाताची! वाहनचालकाचीच केवळ चूक होती आणि नशेने त्याचे सेन्सेस मंदावले होते का हे अजून समजायचं आहे. परंतु जी मुलगी दगावली तिच्या खिशातील मोबाईलमधले ear phones कानाजवळ दिसत होते. अपघाताच्या बाबतीत म्हटलं जातं की Accidents are to be prevented  पंचनामा करून चूक कोणाची हे पोलीस निष्कर्ष काढतीलच आणि न्यायालय योग्य निर्णय देईल पण आपल्या सर्वांनाच आपण काळजी घेऊ शकतो का? हा विचार निदान आपल्या बाबतीत तरी करायची गरज आहे.

Head phones बाबतीत सांगायचं झालं तर बहिरेपणाकरताही ते एक कारण आहे. ६० डेसिबलच्या वर आवाज जो mp3 मध्ये १२०dbपर्यंत जाऊ शकतो हा रोज १ तासाच्यावर वापर झाल्यास बहिरेपणा आणायला कारणीभूत ठरतो. आजच्या पिढीत बहिरेपणाचं किंवा ऐकू कमी येण्याचं प्रमाण ४० वर्षं वयाताच दिसू लागलं आहे. एकाच वेळेला Trade Mill वर चालत Head phones चा वापर तर कधी walk  ला जाताना वापर, बाजूने जाणार्या गाडीचा हॉर्न ऐकूच आला नाही यात नवल ते काय? पण झालेली इजा व्रणाच्या स्वरूपात कायमस्वरूपी आठवण ठेवून जायला नको. यासाठी आधुनिकतेचा स्वीकार करतानाच त्याचे फायदे-तोटे लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं नाही का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *