ऋतुमानातले बदल आपल्या सर्वांनाच जाणवतात. प्रत्येकाच्या पेशाप्रमाणे त्याबद्दल चर्चा होते. दुकानदार सणासुदीला खूश तर उन्हाळ्यापावसाळ्यात ‘सेल’ची चंगळ म्हणून ग्राहकांना आनंद. डॉक्टरांना मात्र उन्हाळा-पावसाळा हा पेशंट्सच्या वेगळ्यावेगळ्या तर्हेच्या तक्रारीतून लक्षात घ्यायला लागतो. किडनी स्टोन म्हणजेच ‘मूत्रपिंडातील खडे’ असलेला पेशंट आला की समजावं उन्हाळा सुरू झाला.

कोणते प्रतिबंधक उपाय हा त्रास दूर ठेवू शकतात? ज्यांना किडनी स्टोन होण्याची प्रवृत्ती आहे त्यांनी दिवसभरात पुरेसं पाणी (२ ते २.५ लीटर) पिणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर लघवी किती झाली हे मोजणंदेखील आवश्यक. साधारण २.५ लीटर लघवी व्हायला हवी. लघवीचा रंग हा Light आणि Clear असेल तर समजावं की पाणी पुरेसं जात आहे.

कोणत्या प्रकारचे खडे आहेत त्यावर आहाराचं पथ्य ठरतं? Calcium Oxalate, Uric acid, Struvite आणि Cystine अशा चार प्रकारचे स्टोन मुख्यत्वे करून दिसतात. यात Calcium Oxalate चे खडे टाळण्याकरता ज्या फळभाज्यांत उदाहरणार्थ, बीटरूट, पालक, रताळे इत्यादी Oxalate चं प्रमाण अधिक असतं त्या टाळाव्यात. मीठाचं प्रमाणही अधिक असू नये. पण वनस्पतीजन्य प्रथिनं अधिक उपयुक्त. जेवणात Calcium असलेले पदार्थ चालतील पण Calcium च्या गोळ्या टाळाव्यात. पथ्याच्या बाबतीत आपल्या डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेणं आवश्यक ठरतं. औषधउपाय योजनेत काही वेळा लघवी अधिक होऊन जाण्याचं औषध (Diuretic) तर कधी Uric acid तयार होण्याचं प्रमाण कमी करणारं औषध दिलं जातं तर इन्फेक्शन झालं असल्यास Antibiotic अशी औषधं वापरली जातात. मोठे खडे जे आपोआप पडून जाऊ शकत नाहीत, ते रक्तस्त्रावास कारण ठरू शकतात. अशावेळेस ध्वनीलहरींचा वापर करून (Shock Wave Lithotripsy – SWL) त्यांचं बारीक तुकड्यात रूपांतर केलं जातं. तर कधी ऑपरेशन करून ते काढावे लागतात. दुर्बिणीद्वारेही काही वेळा खडे काढता येतात.

काही वेळेस पुन्हापुन्हा होणार्या खड्यांचं कारण मात्र काही ग्रंथींचा आंतरस्त्राव वाढणं असू शकतं. (उदाहरणार्थ, Parathyroid gland – hyperparathyroidism). दुसरी एक महत्त्वाची समस्या की ज्या कारणामुळे वारंवार जंतूसंसर्ग म्हणजेच Urinary tract infection होऊ शकतं, ते म्हणजे वेळेत बाथरूमला न जाणं. विशेषतः स्त्रियांच्यात आणि शाळकरी मुलींच्यात ही समस्या जास्त दिसते. ‘स्वच्छ बाथरूमच्या पुरेशा सुविधा नसणं’ हे त्यामागचं एक कारण आहे. पण स्वच्छ नसलेली बाथरूम स्वच्छ ठेवण्याकरता लागली तर ‘पदरमोड करून’ ती स्वच्छ ठेवून वापरणं हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं.

शाळेतील व्यवस्थापनानेदेखील शाळेतील बाथरूमवर विशेष लक्ष पुरवून तिथे पुरेशी स्वच्छता राखण्याची काळजी घेतली तर ते सहज शक्य होईल. Parents – Teacher Associations नीही त्यावर विशेष लक्ष घालायला हरकत नाही. कारण मुलं शाळेत आणि क्लासला मिळून ८ ते १० तास घराबाहेर राहतात. काही वेळा सू करायला नको म्हणून पाणीच न पिण्याचा मार्गही ती अवलंबतात. लहानपणापासून लागलेल्या या सवयींचा परिणाम Bladder capacity वर होऊन एकूण Kidney च्या आजारांच्याकरता पुरेशा बाथरूमच्या सुविधा नसणं हे महत्त्वाचं सामाजिक कारण आहे का? याचा विचार करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *