खरा खेळाडू कोणत्याही मैदानावर खेळाडूच असतो, मग ते चित्रपटाचं मैदान का ना असो?

‘हिरो’ लिएंडर पेसला भेटताना मला प्रामाणिकपणे तसंच वाटलं…

क्रिडापटू सिनेमात अथवा मनोरंजन उद्योगात येणं हा ‘खेळ’ नवा नाही. रंगा सोहोनीपासून विनोद कांबळीपर्यंत तसे बरेच ‘खेळाडू’ आहेत. सुनील गावसकरपासून अजय जडेजापर्यंत त्यात सगळेच ‘शून्या’वर बाद झाले. अरेरे…

खेळाडूचा खेळ मैदानावर बहरला पाहिजे, सिनेमाच्या पडद्यावर नव्हे असाच रसिकांचा कौल असतो तरी…

‘कभी अजनबी थे’च्या जुहूच्या सांगली व्होलामधील सेटवर संदीप पाटीलला भेटताना असाच ‘गुगली’ टाकला तेव्हा त्याने आपल्या स्वभावानुसार षटकार ठोकत मला सांगितलं, मी माझी रोमँटिक भूमिका एन्जॉय करतोय, ती रसिकांपर्यंत नक्की पोहचेल. (देवश्री रॉय त्यात त्याची नायिका होती.) प्रत्यक्षात रसिकांना त्याच्या अभिनयात उत्कटता दिसली नाही. मला तर ‘मिनर्व्हाच्या पडद्यावर’ त्याचा अभिनयच दिसला नाही. ते त्याचं मैदान नाही…

[restrict userlevel=”subscriber”]

लिएंडर पेसची ‘कहानी’ अशीच खेळाडू सिनेमात अपयशी ठरतात याच मागील रिळावरून पुढे रिळावर कायम राहील की त्यात काही टर्नस आणि ट्विस्ट ठरतील…

‘राजधानी एक्सप्30852-sandeep-poonam-dhillonरेस’मध्ये त्याने ‘हिरो’गिरी केलीय नि ती करता करता त्याच्यात सकारात्मक बदल झाल्याचं त्याच्या भेटीत जाणवलं… सर्वात आवडलं, त्याची सहजता. ‘फिल्मी पत्रकारा’ला कसं बरं भेटू असं अवघडलेपण त्याच्यात ‘इतने से भी’ जाणवलं नाही म्हणून त्याच्याशी सुसंवाद सोपा झाला. टेनिसपटू म्हणून जगभरच्या क्रीडा पत्रकारांना भेटण्याचा त्याच्याकडे सराव आहेच, पण ‘सिनेमाच्या जगात’ तो नवा. तरी त्याच्या एकूणच व्यक्तित्त्वात यत्किंचितही नवेपण अथवा क्षेत्रामधला बदल जाणवला नाही, याला पक्की व्यावसायिकता, व्यक्तिमत्त्व विकास असं काहीही म्हणू शकतो. ‘खेळात उत्तुंग यश मिळवताना’ विविध क्षेत्रात खूप सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा एक छानसा दृष्टिकोन त्याच्यात आला, याचाच अर्थ त्याने खेळाचा आनंद घेता घेता चौफेरही ‘पाहिलं’…

‘मी एकाच सिनेमापुरता या क्षेत्रात आलेलो नाही’ हा त्याचा सरळ फटका त्याची ‘हिरोगिरीची नजर’ दूरवर आहे हे स्पष्ट करणारी वाटला. पण हा त्याचा फाजील आत्मविश्वास ठरू नये असा मी ‘मनातल्या मनात’ फटका मारत त्याची सर्व्हिस तोडण्याचा प्रयत्न केला असता तोच मला भानावर आणत म्हणाला, ‘माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मला अभिनयदेखील जमतो, या माध्यमाबाबत मी खरंच गंभीर आहे अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं मिळतील. मला तरी तसा विश्वास आहे.’

लिएंडर पेस मग छान खेळत सुटला, म्हणून तर त्याला ‘खेळवत ठेवत’ त्याच्याकडून चौफेर आणि रंगीन उत्तरं मिळवणं मला योग्य वाटलं. कोणत्याही प्रकारच्या मुलाखतीत प्रश्नकर्त्याने बॅकफूटवर राहून उत्तर देणार्याला खेळू द्यायचं असतं. लिएंडरने शाब्दिक खेळ छानच रंगवला.

मी फक्त अभिनेता नाही तर चित्रपटाचा अभ्यासक आहे. मी फक्त मनोरंजनासाठी चित्रपट पाहत नाही, तर वेगवेगळ्या कारणांसाठी एकच चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्याचा मला कंटाळा येत नाही. मी फक्त होम थिएटर अथवा विमान प्रवासात चित्रपट पाहतो असं नव्हे, तर जेव्हा जसा वेळ मिळतो त्याप्रमाणे चित्रपट पाहतो. चित्रपट मला टेनिस खेळण्यासाठी प्रेरणा देतात असं म्हटलं तरी चालेल, मी हिंदी आणि इंग्रजीप्रमाणे अन्य भाषांचेही चित्रपट आवर्जून पाहतो. (लिएंडर हे सगळं मला व्यवस्थित हिंदीत सांगत होता हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं, आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतले बरेचसे कलाकार हिंदीतील प्रश्नाना छान इंग्रजीत उत्तर देतात, ते ‘स्टाईल में रहनेका’ या मस्तीतून की त्यांना हिंदी फारसं येत नाही म्हणून? कतरिनाला ते खरंच येत नाही.)

लिएंडरने आता एकेक चढाईच सुरू ठेवली, तेव्हा मला त्याला बोलतं ठेवणं गरजेचं वाटलं. ‘मी ‘शोले’ किती वेळा पाहिला आहेस?’ असा प्रश्न करताच तो पुढे म्हणाला, ‘शोले’ मी एकशे पाच वेळा पाहिला, तरी त्याचा मला अजिबात कंटाळा नाही. कधी ‘एक क्लासिक’ म्हणून पाहतो, कधी जोरदार संवादासाठी पाहतो, कधी गब्बर सिंगसाठी पाहतो. सर्वोत्तम हिंदी चित्रपट कसा असावा याचं ‘शोले’ उत्तम उदाहरण…’

म्हणजे ‘शोले’ तुझा सर्वाधिक आवडता चित्रपट?

‘अमर अकबर अॅन्थनी’ माझा सर्वात जास्त आवडता चित्रपट, लिएंडरने पुन्हा माझी सर्व्हिस तोडत थेट उत्तर दिलं. तो पुढे म्हणाला, मस्त मनोरंजक चित्रपट कसा असावा हे ‘अमर अकबर अॅन्थनी’ पाहून समजतं. कधीही पहावं आणि फे्रश व्हावं. हा चित्रपट म्हणजे जणू टॉनिक आहे, त्याबाबत दिग्दर्शक मनमोहन देसाईंचं खास कौतुक करायला हवं.

लिएंडर असा छान खेळत असताना त्याला ‘हिंदी चित्रपट म्हणजे नेमकं काय’ याची बरीच चांगली कल्पना असल्याचं जाणवलं. या गुणावर तो हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी होईल का, असा थेट प्रश्न त्याला कसा करणार? हिंदी सिनेमात करिअर करण्यासाठी नेमकं काय लागतं याचं थर्मामीटर/तराजू/कोष्टक/मेजरमेंट नाही. स्टारपुत्र हमखास यशस्वी ठरतात म्हणायचं तर कुमार गौरव कधी हद्दपार झाला हे समजलं नसतं का? पूर्वप्रसिद्धीचा डंका फिट होतो म्हणायचं, तर हरमन बवेजा आज टॉप ब्रेकेटमध्ये हवा होता. हिंदीचा ‘लहेजा’ मस्ट म्हणावं तर कतरिना कैफच्या ओठांना हिंदीची सवयच नाही. (तिच्या मादक पर्सनॅलिटीला इंग्रजी सूट होतं.) तरी ती ‘प्रगतीशील’ आहे…

लिएंडर पेस हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर खेळायला तर लागलाय, आपले डावपेच, कौशल्य, धोरण या गुणांवर तो मैदान खरंच मारतो का हे पाहयचं आहे. सगळेच खेळाडू सिनेमाच्या मैदानात पराभूत झाले अशी नोंद नको व्हायला…
[/restrict]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *