मराठी माध्यमातील पोकळी भरून काढत उल्लेखनीय प्रयोग करत असलेल्या ‘कलमनामा’ साप्ताहिकाचा करण्यात आला. दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सभागृहात पार पडलेला सोहळा उपस्थितांना नवी ऊर्जा देणारा ठरला. समाजातील बर्या वाईट घटनांवर मार्मिक भाष्य करणार्या ‘कलमनामा’ने समाजभान हरपतंय का हा विशेष परिसंवाद आयोजित करून समाजातील प्रत्येक व्यक्तिच्या विचारांना चालना देण्याचा प्रयत्न केला. नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, स्वामी अग्नीवेश, राज्य निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण, ज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजन आणि आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी या परिसंवादात आपले विचार मांडले. या परिसंवादाचं सूत्रसंचालन एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रसन्न जोशी यांनी केलं. त्यांनी अतिशय उत्तमरित्या परिसंवादात सहभागी झालेल्या दिग्गजांना बोलतं केलं.

 

पहिला वर्धापन दिन साजरा

एका वर्षाच्या प्रवासातच ‘कलमनामा’ने वेबसाईट या सोशल नेटवर्किंगच्या नव्या माध्यमात प्रवेश केला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या हस्ते ‘कलमनामा’च्या www.kalamnaama.com या वेबसाईटचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी निखिल वागळे यांनी ‘कलमनामा’ला शुभेच्छा दिल्या. साप्ताहिक ‘कलमनामा’ने एका वर्षातच माध्यमात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. वैचारिक बेट असलेलं हे साप्ताहिक माणसाला पेटून उठण्यास आणि विचार करायला लावणारं आहे, अशा शब्दांत निखिल वागळे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रतिकूल परिस्थितीत सीए सारख्या कठीण परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या कोल्हापूरच्या धनश्री तोडकर या विद्यार्थिनीचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. यशाची केवळ बातमी म्हणून न पाहणार्या ‘कलमनामा’ने धनश्रीचा सत्कार करून तरुणाईमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *