िनळ्याशार समुद्राची पार्श्वभूमी आणि लांबच लांब शुभ्र पांढरे वाळूचे समुद्रकिनारे याबरोबरच १५०३ मीटर्स उंचीचा हॅगहायर हा पर्वत हे जवळपास ३७९६ स्क्वे. किमी. परिसरात वसलेला प्रदेश म्हणजे सोकोट्रा द्विपसमूह. अरब राष्ट्रांतील येमेन या देशातील सोकोट्रा हा सर्वात मोठा द्विपसमूह आहे. सोकोट्रा, अब्द अल कुरी, समहाह आणि दरसा या चार बेटांनी बनलेल्या हा द्विपसमूह यातील सर्वात मोठं बेट असलेल्या सोकोट्रा या नावाने ओळखला जातो. सोकोट्रा हे नाव मूळ सुखधारा (म्हणजेच निर्भेळ आनंद) द्विप या संस्कृत शब्दापासून तयार झाल्याचं म्हटलं जातं. पृथ्वीवरील इतर बहुतेक बेटं ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाली आहेत. परंतु हे बेट मुळातच जमिनीचाच एक भाग होतं. अरुंद, सपाट समुद्रकिनारे, चुनखडकाचे पठार आणि गुहादेखील या प्रदेशात आहेत. त्यामुळे इथे पूर्वापार मनुष्यवस्ती असल्याच्या खुणा आढळतात. इथल्या गुहांमध्ये कोरलेले लेख, चित्रं आणि पुरातन वस्तू सापडतात. यामधील लेख हे भारतीय ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहेत.

[restrict userlevel=”subscriber”]

सोकोट्राला युनेस्कोने जागतिक वारश्याचा दर्जा दिला आहे त्याचं कारण म्हणजे या परिसरात आढळणारी जैवविविधता… अरबी समुद्रातली जैवविविधतेची खाण अशीच या प्रदेशाची ओळख आहे. जवळपास ७०० प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांच्या काही जाती केवळ याच बेटांवर आढळतात. तसंच ड्रॅगन ट्रीज् ही वैशिष्ट्यपूर्ण झाडंही इथेच आढळतात. छत्रीच्या आकारातलं विचित्र दिसणार्या ड्रॅगन ब्लड ट्री नावाच्या या झाडाचा उपयोग पूर्वी औषधं तसंच डाय बनवण्यासाठी करण्यात येत असे. आता रंगामध्ये आणि व्हार्निशमध्ये याचा वापर केला जातो. ड्रॅगन ट्री प्रमाणेच इतरही काही विशिष्ट झाडं आणि प्राणी-पक्षीही इथे आढळतात. तसंच इथल्या किनार्यालगतच्या समुद्रात रंगीबेरंगी प्रवाळही नजरेस पडतात. त्यामुळे सोकोट्रा या एकाच परिसरात पर्यटकांना वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येतो.

adansonia1हिंदी महासागरात वसलेला सोकोट्रा हा द्विपसमूह येमेन देशाचा भाग असून हडिबू हे इथलं सर्वात मोठं शहर आहे. पूर्वी इथे जाणं खूपच जिकिरीचं होतं. परंतु आता सोकोट्रा इथे एअरपोर्ट बांधण्यात आल्यामुळे ते संपूर्ण जगाशी जोडलं गेलं आहे. पर्यटनाचा अनोखा आनंद अनुभवण्यासाठी सोकोट्रा आयलंड हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

[/restrict]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *