गेल्या वर्षी याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साप्ताहिक ’कलमनामा‘ने मोठ्या आत्मविश्वासाने आणि दिमाखात माध्यमविश्वात पदापर्ण केलं. त्यावेळी जो जल्लोष, उत्साह आणि प्रतिसाद ’कलमनामा‘च्या वाट्याला आला होता त्यात अवघ्या एका वर्षांत दुप्पटीने वाढ झाली होती. याचीही पोचपावती ’कलमनामा‘च्या पहिल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मिळाली. वाचक, जाहिरातदार, हितचिंतक आणि मान्यवरांच्या विशेष उपस्थित हा सोहळा पार पडला. हीच ’कलमनामा‘ला पहिल्या वर्धापनदिनासाठी लाभलेली भेट होती… वर्धापनदिनाच्या सोहळ्याचं संपूर्ण आयोजन ’कलमनामा‘च्या टीमने केलं होतं. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली होती. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनीही सोहळ्याला मोठी गर्दी केली होती.

 

 

[restrict userlevel=”subscriber”] [satellite gallery=2] [colored_box color=”yellow”]

धनश्री द आयकॉन

एक वर्षापूर्वी जेव्हा ’कलमनामा‘चा प्रकाशनसोहळा पार पडला तेव्हा पुण्याचा जिगरबाज तरुण शरीफ कुट्टी या तरुणाचा सत्कार करण्यात आला होता. शरीफने जिवावर उदार होऊन एका माथेफिरू एसटी चालकाला जेरबंद केलं होतं. त्याच्या साहसामुळे तेव्हा अनेकांचं जीव वाचले होते. समाजातील अशा साहसी तरुणांना लोकांसमोर आणून आजच्या तरुणाईला नवनवीन आयकॉन मिळवून देण्याच्या हेतूने तेव्हा शरीफच्या साहसाला सलाम करण्यात आला होता. आताही पहिल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ’कलमनामा‘ने आपली ही परंपरा कायम राखली. आजच्या तरुणाईला अजून एक आयकॉन मिळवून दिला. सीए सारख्या सर्वात कठीण समजल्या जाणार्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणार्या धनश्री तोडकर या गुणी विद्यार्थिनीचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. धनश्रीने प्रतिकूल परिस्थितीत ही परीक्षा उत्तीर्ण केलीय. धनश्रीने घेतलेल्या मेहनतीला सलाम करण्यासाठीच हा सत्कार सोहळा घडवून आणण्यात आला होता. धनश्रीने यावेळी आपलं जे मनोगत व्यक्त केलं ते ऐकून तरुणाईला शिकण्याची आणि जगण्याची एक नवी उमेद मिळाली…

dhanshree‘आज तुमच्यासमोर मी सीए धनुश्री तोडकर बोलते आहे. बारावीनंतर मी सीए होण्याचं ठरवलं. पण घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. सहा मुली आणि एक मुलगा अशा भल्यामोठ्या कुटुंबाचा भार माझ्या आईवडिलांवर होता. आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे आमची एकमेव चहाची गाडी… यामुळे या व्यवसायात आईवडिलांना मदत करतच मी शिक्षणाचा प्रवास सुरू केला. या दरम्यान अनेक अडथळे आले. त्यावर सतत मात केली. माझ्या शिक्षणासाठी लहान भावाला अभ्यास सोडून नोकरी करावी लागली. अनेक संकटं येत होती. याच कालावधीत महानगरपालिकेने आमची चहाची टपरीही उचलून नेली. त्यामुळे कुटुंबियांचं ते एकमेव उदरनिर्वाहाचं साधनच गेलं. मात्र यावरही मार्ग काढत आम्ही आमचा व्यवसाय सुरूच ठेवला. आईवडील आणि कुटुंबामुळे मी सीए बनली आहे. माझ्या आईवडिलांनी आम्हा सर्व भावडांना स्वतः प्र्रचंड काबाड कष्ट करून शिक्षण दिलं. आज समाजात स्त्री भ्रूण हत्या होत असताना माझ्या आईवडिलांनी मात्र आम्हा सहा बहिणींवर जीवापाड प्रेम करून आमचा उत्तम सांभाळ केला. आम्हाला प्रकाशाचे पंख दिले. संस्कारांचं अमृत दिलं. यामुळेच माझ्या पंखात बळ आलं. प्रसंगी उपाशी राहून माझ्या पालकांनी आमचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या प्रचंड त्यागामुळेच माझ्या दोन बहिणी आज शिक्षिका होऊ शकल्या. एक बहीण एलआयसी एजंट आहे. आज मला ठिकठिकाणी आमंत्रित केलं जातंय. माझा सत्कार केला जातोय. पण जेव्हा माझा सीए चा निकाल लागला आणि आम्हाला कळलं की मी पहिली आलीय. तेव्हाच मला माझ्या मोठ्या बहिणीने एक कानमंत्र दिलाय. ती म्हणाली, तू कितीही मोठी झालीस तरी जमिनीशी असलेलं तुझं नातं तोडू नकोस… बहिणीचं हे वाक्य मी कायमच लक्षात ठेवलंय. यापुढेही या वाक्याचा विसर पडू देणार नाही.

माझं इथवरचं शिक्षण पूर्ण करण्यास अनेकांनी खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्या मदतीमुळेच माझं शिक्षण पूर्ण झालंय. राजकीय लोकांनी दिलेल्या आश्वासनावर लोक विश्वास ठेवत नाहीत. पण एका राजकीय व्यक्तीने माझ्या शिक्षणाचा खर्च उचलला. आपल्या राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी माझ्या शिक्षणाचा खर्च उचलला. त्यांच्या मदतीमुळेच आम्हाला हे खर्चिक आव्हान पेलणं शक्य झालं. यामुळे मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगावीशी वाटतेय. ती म्हणजे, मदत करणारा एकवेळ त्याने केलेली मदत विसरून जाऊ शकतो. पण त्याने ज्याला मदत केलीय ती व्यक्ती ती मदत आणि मदत करणार्या व्यक्तीला कधीच विसरत नाही. मग भले ती मदत एका साध्या पेनाचीही का असेना. जेव्हा एखादी विद्यार्थी परीक्षेत पास होतो तेव्हा त्याला त्या पेनाची आणि पेन देणार्याची निश्चितच आठवण होते. यामुळेच तुमच्या पैकी प्रत्येकाने जमेल तशी अगदी छोट्यातली छोटी का होईना पण दुसर्याला, गरजूंना मदत करायला हवी. असं मी माझ्यावतीने तुम्हा सर्वांना आवाहन करते…’

[/colored_box] [colored_box color=”blue”]

शाहिरांचं कँडल भारूड

DSC_0009आणि अखेर पडदा उठला. शाहीर संभाजी भगत आणि त्यांच्या त्यांच्या क्रांतीगीतांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिली दोन गाणी सादर झाली आणि तितक्यातच सभागृहाचा वीजपुरवठा खंडीत झाला. अचानकच सारं सभागृह अंधारात बुडून गेलं. प्रेक्षकांमध्ये एकच सन्नाटा पसरला. समोर काहीच दिसत नव्हतं मात्र प्रेक्षकांची कुजबूज कानी पडत होती. सभागृह मोबाईलच्या लाईटने चमकू लागला. आणि तितक्यातच रंगमंच मेणबत्त्यांच्या प्रकाशाने उजळला… शाहीर संभाजी भगतांनी आपल्या पहाडी आवाजात पुन्हा एकदा क्रांतीगीतांच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. कोणत्याही साऊंड सिस्टिमशिवाय शाहीर शिरीष पवारांसारख्या त्यांच्या तरुण कलावंत, सहकारींसोबत आपली कला पेश करत होते. प्रेक्षकही त्यांना भरभरून प्रतिसाद देत होते. यावेळी संभाजी भगतांचं ग्लोबल भारूड मस्त रंगलं. अख्खं सभागृह त्यात सहभागी झालं. कॅन्डल भारूड हा अनोखा अनुभव प्रेक्षकांना घेतला.

अवती-भवती घडणार्या घटना संवेदनशील शाहिराला कशा अस्वस्थ करतात, याचीही प्रचिती यावेळी आली. त्यामुळेच संघर्ष करून, पेटून उठलं पाहिजे, ही भावना शाहीर संभाजी भगत यांनी आपल्या शाहिरीतून व्यक्त केली. आणि तेव्हाच अंधार पळून गेला आणि दिवेही उजळले…

[/colored_box] [colored_box color=”grey”]

वेबसाईटचं अनावरण

DSC_0059आगमी काळ हा पूर्णपणे इंटरनेटचा जमाना म्हणूनच ओळखला जाणार आहे. काळाच्या या पाऊलखुणा ‘कलमनामा’ने अचूक ओळखल्या. अवघ्या एका वर्षाच्या कारकिर्दीतच इंटरनेटच्या जगातही ’कलमनामा‘ने पदापर्ण केलं. पहिल्या वर्धापनदिनाच्यानिमित्ताने ‘कलमनामा’च्या संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं. वैभव छाया आणि सुनील गजकोश या दोन तरुणांनी अतिशय सुबक आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत ‘कलमनामा’ची www.kalamnaama.com ही वेबसाईट तयार केलीय. ‘आयबीएन लोकमत’चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं. संकेतस्थळाचं उद्घाटन करून निखिल वागळे यांनी ‘कलमनामा’ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या…

[/colored_box] [/restrict]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *