भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे राजदूत सलमान बशीर यांना समन्स बजावलंय. भारत-पाक वन डे सिरिज संपल्यानंतर अवघ्या ४८ तासांच्या आतच पाकिस्तानच्या सैनिकांनी दोनवेळा युद्धबंदीचा भंग केला. दुसर्यावेळी युद्धबंदीचा भंग करताना पाकिस्तानने जिनिव्हा कराराचा भंग करत भारतीय सैनिकांचा शिरच्छेद केला आणि एकाचं शिर घेऊन पळ काढला. या अमानवी प्रकाराचा निषेध करण्यासाठी आणि पाकिस्तानला समज देण्यासाठी राजूदत बशीर यांना समन्स बजावल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या युद्धबंदी मोडण्याच्या कृतीचा संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी निषेध केला आहे. पाकिस्तानने युद्धबंदी मोडली तसंच लष्करी संकेत आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं जाहीर उल्लंघनही केलं आहे. पाकिस्तानची कृती ही अति-आक्रमक अशा स्वरुपाची आहे, अशा शब्दांत अँटनी यांनी आपला निषेध व्यक्त केलाय.

गेल्या आठवड्यातील मंगळवारी पाकिस्तानच्या सैनिकांनी दाट धुक्याचा गैरफायदा घेत मेंढर इथे नियंत्रण रेषा ओलांडली. भारताच्या हद्दीत सुमारे अर्धा किलोमीटर आतमध्ये प्रवेश करून गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या या हल्ल्यात लान्स नाईक हेमराज आणि लान्स नाईक सुधाकर सिंह शहीद झाले. भारताच्या शहीद जवानांपैकी एकाचं शिर घेऊन पाकिस्तानचे सैनिक पळून गेले. जाताना त्यांनी भारतीय सैनिकांची शस्त्रं आणि दारुगोळाही पळवून नेला. मात्र असं कोणतंही कृत्य आपल्या सैनिकांनी केलं नसल्याचं पाकिस्तानी लष्कराकडून सांगण्यात येतंय. त्यांनी या हल्ल्याचा इन्कार केलाय.

ओवैसीच्या घरावर विहिंपचा हल्ला

भडकावू भाषण केल्याप्रकरणी ‘मजलिस ए इत्तेहैदल मुसलमीन’चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ओवैसी यांना अदिलाबाद इथल्या तुरुंगात नेण्यात आलं आहे. ओवैसी यांना अटक झाल्याने ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केलीय. यामुळे हैदराबाद आणि परिसरात तणाव आहे.

owaisiओवैसी यांच्या वक्तव्याचा निषेध करणार्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ओवैसी यांच्या मोठ्या भावाच्या दिल्लीतील घरावर हल्ला केला होता. ओवैसी यांचे बंधू असदुद्दीन हे खासदार आहेत. या हल्ल्यानंतर ‘मी घरात असताना असा हल्ला करून दाखवा,’ असं उघड आव्हान असदुद्दीन यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला दिलंय. ओवैसी यांना अटक झाल्यानंतर हैदराबादमधील तणाव आणखी वाढला आहे. ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी अदिलाबादमध्ये प्रसारमाध्यमांच्या ओबी व्हॅन जाळल्या. परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांनी हैदराबाद आणि अदिलाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे.

ओवैसी यांची वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अटक करण्यापूर्वी सरकारी रुग्णालयामध्ये ओवैसी यांच्या ११ वैद्यकीय चाचण्या झाल्या. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रुग्णालयाबाहेर ओवैसी समर्थकांनी गोंधळ घातला होता. या चाचण्यांदरम्यान ओवैसी यांचे डॉक्टरही रुग्णालयात उपस्थित होते. पण त्यांना प्रत्यक्ष चाचणीदरम्यान उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती. प्रक्षोभक भाषण केल्याने दाखल झालेल्या खटल्यासाठी पोलीस चौकशीला सामोरे जाण्याइतके ओवैसी तंदुरुस्त आहेत, असा अहवाल डॉक्टरांनी दिला आणि पोलिसांनी त्वरित ओवैसी यांना रुग्णालयातच अटक केली.

रेल्वे प्रवास महागला

railway-Aगेली दहा वर्षं रेल्वेप्रवासी भाडेवाढ रोखून धरणार्या रेल्वे मंत्रालयाने अखेर प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेतलाच. ही नवी भाडेवाढ येत्या २१ जानेवारीपासून लागू होणार आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी भाडेवाढीचा निर्णय जाहीर केला. अगोदरच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या भाडेवाढीमुळे आणखी अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. ही दरवाढ करताना बन्सल यांनी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात भाडेवाढ होणार नसल्याचंही सांगितलंय. मात्र यामुळे रेल्वे प्रवाशांना कितपत दिलासा मिळणार आहे, हा एक प्रश्नच आहे.

या भाडेवाढीमुळे रेल्वेला ६ हजार ६०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. यापूर्वी २००० मध्ये नितीशकुमार रेल्वेमंत्री असताना भाडेवाढ करण्यात आली होती, त्यानंतर आता ही मोठी दरवाढ करण्यात येत आहे. भाडेवाढ प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठीच करण्यात आल्याचं बन्सल यांनी सांगितलं.

अशी होणार रेल्वेचे दरवाढ

price-hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *