उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेचा काल रात्री ११.४० वाजता मृत्यू झाला. पीडितीनं दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ती ९० टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कार्डिअॅक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

उन्नाव पीडितेच्या वडिलांची मागणी

पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हैदराबादमधील आरोपीप्रमाणेच आपल्या मुलीच्या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. दरम्यान बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसंच पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मारहाणदेखील करण्यात आली होती. अशीही माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली आहे. यावेळी कुटुंबीयांनी लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी सरकारकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *