मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर भाजपने टिका केली आहे. ‘सूत्रांनुसार, महाराष्ट्र सरकारकडून लवकरच दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीन चिट देण्याची शक्यता आहे,’ कारण सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु आहे. घाई करा थोडेच दिवस बाकी आहेत, असं ट्विट मुंबई भाजपचे सरचिटणीस मोहित भारतीय केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी रविवारी  कारशेडविरोधी आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला होतो. तसंच उद्धव ठाकरे यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ७२ जणांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश सोमवारी दिला आहे. नाणार प्रकल्प रद्द करा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *