शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. तसंच सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपदाचंही आश्वासन देण्यात आलं होतं, असा दावा शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता. शरद पवारांच्या या गौप्यस्फोटाच्या आधारेच शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले. याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल,’ अशा शब्दात मोदी आणि शहा यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेत्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ नये यासाठी पडद्यामागे जे भव्य नेपथ्य आणि दिग्दर्शन सुरू होते ते नाट्य शरद पवार यांनी समोर आणले आहे. शरद पवार झुकले नाहीत. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. काँग्रेसने शहापण दाखवला असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *