काँग्रेसच्या भारत बचाव रॅलीमध्ये  राहुुल गांधी यांनी आपल्या कालच्या रेप इन इंडिया विधानावर भाष्य केलं आहे. माझं नाव राहुुल सावरकर नाही, माझं नाव राहुुल गांधी आहे, त्यामुळे मी माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींनी आणि अमित शाह यांना देशाची माफी मागावी असं राहुुल गांधी यांनी म्हटलं आहे. भारत बचाव रॅलीमध्ये राहुुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Rahul Gandhi, at party’s ‘Bharat Bachao’ rally: I was told in Parliament by BJP y’day ‘Rahul ji, you gave a speech. Apologise for that.’ I was told to apologise for something which is right. My name is not Rahul Savarkar. My name is Rahul Gandhi. I will never apologise for truth. pic.twitter.com/XiGWs81YAe

— ANI (@ANI) December 14, 2019

देशातील वाढती महागाई, कमकुवत झालेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी, देशातील बलात्काराच्या वाढत्या घटना या मुद्दयांवर राहुुल गांधींनी भाष्य केलं. मोदी सरकारमुळे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. मोदी सरकारमुळे देशाची जीडीपी ४ टक्क्यांवर आली आहे. मागच्या पाच वर्षात मोदींनी अडाणीला १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची ५० कंत्राटं दिली आहेत. मोदींनी नोटाबंदी करुन स्वतः देशाची अर्थव्यवस्था संपवली आहे असं राहुुल गांधी यांनी म्हटलं आहे.

प्रियांका गांधी यांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली आहे. BJP है तो महंगाई मुमकिन है, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी भाजपच्या ‘मोदी है तो मुमकिन है’ या घोषणेवर टीका केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *