पाडापाडीचं राजकारण करणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करेन, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं की, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते बाहेर, जनतेसमोर मांडा. दोघांच्या शब्दिक वादामुळे भाजपमध्ये भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली आहे. जळगावात भाजपाची विभागीय समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीकडे खडसेंनी पाठ फिरवल्याचं वृत्त प्रथम आलं होतं.  मात्र साडेतीन वाजताच्या सुमारास खडसे बैठकीला दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना  नाव न घेता टीका केली. मी काही नाराज वगैर नाही. गिरीशभाऊंनी सांगितलं होते की, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते बाहेर, जनतेसमोर मांडा. माझ्याकडे नावानिशी सर्व पुरावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *