भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी  खळबळजनक विधान केलं आहे. केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बहुुमत नसतानाही मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या सरकारकडून केंद्र सरकारच्या ४०,००० कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी असं करण्यात आलं होतं.

BJP leader Ananth K Hegde in Uttara Kannada yesterday: You all know our man in Maharashtra became CM for 80 hours. Then, Fadnavis resigned. Why did he do this drama? Didn’t we know that we don’t have majority and yet he became CM. This is the question everyone is asking. pic.twitter.com/DsWKV2uJjs

— ANI (@ANI) December 2, 2019

शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला होता. त्यानंतर फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक कशासाठी केलं? बहुुमत नसतानाही ते मुख्यमंत्री कसे झाले? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. आम्ही नाटक घडवून आणलं. फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि १५ तासांत केंद्राचे ४० हजार कोटी निधी परत केंद्राकडे पाठवण्यात आला, असंही हेगडे म्हटलं आहे.

शिवसेनेची टिका

भाजपने महाराष्ट्रासोबत गद्दारी केली आहे अशी टिका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलं. महाराष्ट्राचा ४० हजार कोटींचा विकासनिधी केंद्राकडे परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले, भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे सांगत आहेत. ही महाराष्ट्रासोबत गद्दारी आहे. असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *