राज्यात पुन्हा एकदा महाभरती सुरु होणार आहे. भाजपाचे १२ आमदार आणि राज्यसभेतील खासदार लवकरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त केली होती. भाजपचे तब्बल 12 आमदार आणि राज्यसभेचा एक विद्यमान खासदार देखील राजीनामा देणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. 12 आमदारांनी एकाच वेळी राजीनाम दिला तर त्याचा मोठा परिणाम भाजपवर होऊ शकतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा एक आठवडा पूर्ण झाला आहे. 12 आमदार आणि राज्यसभेचा एक विद्यमान खासदार महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात आहे अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे. या मध्ये मराठवाड्यातील 3, पश्चिम महाराष्ट्रातील 5 आमदारांचा समावेश आहे. तसंच आणखी 4 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या आमदारांची स्वत:च्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला जाण्याचीही तयारी असल्याचं कळतंय. राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या आमदारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *