काँग्रेसचे खासदार हुुसेन दलवाई यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सनातन संस्थेकडून महाराष्ट्रात दहशतवाद पसरवला जात असून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात देखील या संस्थेचा सहभाग आहे. तसंच ‘सनातन’चे प्रमुख आठवले यांनाही तुरुंगात टाकलं पाहिजे,’ असं हुुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे खासदार हुसने दलवाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही मागणी केली आहे. यावेळी त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर ही भाष्य केलं. भीमा कोरेगाव प्रकरणात विनाकारण काही लोकांना गोवण्याचं काम केलं गेलेलं आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचा थेट सहभाग होता. हे दोघे दहशतवाद पसरवणारे लोकं आहेत. नव्या सरकारनं त्यांच्याबाबत तातडीने भूमिका घ्यावी, असं मत हुुसेन दलवाई यांनी मांडलं आहे.

हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना सरकार सनातनवर कारवाई करेल का? यावर दलवाई म्हणतात, की शिवसेनेने कधीही सनातन संस्थेला पाठींबा दिलेला नव्हता. त्यामुळे हे नक्कीच शक्य होईल, असं  त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *