शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. १०५ किंकाळ्या… आणि वेड्यांचा घोडेबाजार असं अग्रलेखाचे शीर्षक आहे. सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच आता सरकार फक्त आमचेच बरे का! हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? असा  प्रश्न या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. राज्यात पुन्हा आमचेच सरकार येणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. या विधानावर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआडून घोडेबाजार भरवण्याचे मनसुबे आता उघड झाले आहेत, असा आरोप उद्धव यांनी केला भाजपवर केला आहे.

उद्धव ठाकरे  यांनी या लेखातून भाजपला १०५ वाले असं हीणवलं आहे. राज्यात नवी समीकरणं जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरु झाले आहेत. पुन्हा आमचेच सरकार’ अशा किंकाळ्या महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाडत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील आणि किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल. महाराष्ट्रात वेड्यांच्या रुग्णांत भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला बाधक आहेत. आम्हाला याची चिंता वाटते. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे जसे सत्य तसे या जगात कोणीच अजिंक्य नाही. महाराष्ट्रात सत्य भगव्याच्या तेजाने फडकणार आहे.  अशा शब्दात भाजपवर टीका करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *