मी पुन्हा येईन असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार केला. पण सामान्य जनतेला फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदी नको. कालपासून ट्विटरवर #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM हे दोन हॅशटॅग्ज प्रचंड ट्रेण्ड होत आहेत. या ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदी नको अशी मागणी मोठ्या प्रमाणावर ट्विटरकर करताना दिसत आहेत.

 

मागच्या पाच वर्षात शेतकरी आत्महत्या काही थांबल्या नाहीत. आरेमधील वृक्षतोड, राज्यात वाढत असलेली बेरोजगारी, कोल्हापूर-सांगलीतील पूर या विविध मुद्द्यांवरून फडणवीसांच्या कामगिरीवर लोक नाखूश आहेत. म्हणूनच फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदी नको अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरु आहे. मात्र शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेने सरकार स्थापन करावं असाही सल्ला अनेकांनी ट्विटवर दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *