”चौकीदार चोर है ” या वक्तव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारलं आहे. राहुल गांधी यांनी बोलताना काळजी घ्यावी असा सल्ला न्यायालयाने राहुल यांना दिला आहे. लोकसभा निवडणुकी प्रचारात ‘चौकीदार चोर है’ हे वाक्य  राहुल गांधी यांनी  प्रसिद्ध केलं होतं. मात्र या विधानाविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयान आपला निर्णय दिला आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या विधानावरुन मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राफेल विरोधातील पुनर्विचार फेटाळून लावली आहे. राफेल विमानांच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नाही असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *