शिवसेना आणि भाजपमधील सत्तास्थापनेबाबतचा वाद काही केल्या मिटत नाही. भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात जर सत्तास्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवटी लागू होईल असं विधान केलं होत. या विधानावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रपती राजवटी भाषा करुन तुम्ही महाराष्ट्रच्या जनतेचा अपमान केला आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. ईडीनंतर आता राष्ट्रपतींच्या नावाचा गैर वापर केला जात आहे. राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का? असा संतप्त सवालही राऊत यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. भाजपाला 105 जागा मिळाल्या आहेत. सेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. शिवसेने सत्तेत समान अधिकार मागत आहे. तसंच शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मागत आहे. त्यामुळे सरकार स्थापनेचा पेच महाराष्ट्रापुढे निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *