शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.  रत्नाकर भीमराव चौरे यांनी औरंगाबाद येथील बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत रत्नाकर यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केला. या प्रचारामध्ये त्यांनी हिंदुत्त्वाचे रक्षण करण्यासाठी, भाजप महायुतीला मतदान करा असं सांगितलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनांवर मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाने महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान करुन निवडून दिले. या तक्रारीत आमदार प्रदीप जैस्वाल आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नावाचा ही उल्लेख आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नावाखाली मते मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेने युती तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मला आणि कुटुंबाची फसवणूक केली आहे असं रत्नाकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी माझी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असं रत्नाकर चौरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *