महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी, शिवसेनेला कोणच रोखू शकणार नाही, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नव्या सरकारच्या फॉर्म्युल्याची चिंता करू नका असंही राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन, असं आम्ही म्हणणार नाही, कारण पुढची २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. लवकरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सत्तेचा फॉर्म्युला ठरवतील असं ही राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासात यशवंतराव चव्हाण यांचं मोठ योगदान आहे असंही राऊत म्हणाले. या आधीही भिन्न विचारधारांच्या लोकांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं होते. संजय राऊत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे उदाहरण दिलं. त्यामुळ भिन्न विचारधारा असलीतरी कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *