काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी संधीसाधू आहे. सहा ते आठ महिन्यांपेक्षा जास्त हे सरकार टिकणार नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. या तीन पक्षांची विचारधारा भिन्न आहे. या भिन्न विचारधारेमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही. भाजपा आणि शिवसेनेची युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली होती. शिवसेनेच्या विचारधारेला काँग्रेसने नेहमीच विरोध केला.

महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही. महाविकास आघाडी महाराष्ट्रात स्थिर सरकारही देऊ शकणार नाही. महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होईल. हे जनतेसाठी चांगलं नाही असं  नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. तिन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेचा फॉर्म्युला आणि किमान समान कार्यक्रम ही निश्चित झाला आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलेलं नाही. मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा जोरदार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *