अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी. तसंच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आज आमदार बच्चू कडू यांनी राजभवनावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र राजभवनावर जाण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. नंतर त्यांची सुटका कऱण्यात आली. यानंतर बच्चू कडू आझाद मैदानात पोहोचले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी राज्यपालांना किमान मदतीची घोषणा तरी करावी अशी मागणी केली आहे. या मोर्चात राज्याच्या विविध भागांतून आलेले शेतकरी सहभागी झाले होते.

 

मलबार हिल आणि गिरगाव परिसरातून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी आज राजभवनावर मोर्चाचं आयोजन केलं होतं.राजभवनावर मोर्चा काढण्यात येत असल्याने परिसराला पोलीस छावणीचं रुप आलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *