आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महाराष्ट्रात उद्याच बहुुमत चाचणी घ्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसंच यावेळी गुप्त मतदान होणार नाही. ओपन बॅलेट पद्धतीने मतदात होणार आहे. मतदानाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. आमदारांच्या शपथविधीनंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुुमत चाचणी प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जावी, असा आदेशही न्यायालयाने दिले आहेत. बहुुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारकडे फक्त ३० तासांचा अवधी आहे.

रविवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या सरकारविरुद्ध न्यायालयात पुन:विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद झाला. आज न्यायमूर्ती एन. व्ही. रमण, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठाने महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *